देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत असे गंभीर आरोप नवाब मलिक यांनी आजच्या (10 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत केले आहेत. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सुचक आणि खोचक ट्विट केले आहे. FADNAVIS VS MALIK: Nawab Malik’s ‘Hydrogen Bomb’ – Fadnavis’s ‘Twistra’; I don’t want to wrestle with a pig …
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नवाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी फडणवीस यांनी एक मार्मिक ट्विट केले आहे. या ट्विटची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू असल्याने आता हे प्रकरण आणखीनच पेटणार अस दिसून येत आहे.
नवाब मलिक यांच्या खळबळजनक आरोपांनंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी फार आधीच शिकलोय’ असं ट्विट केलं आहे. देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेऊन मलिकांना काय उत्तर देणार, याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं असतानाच फडणवीसांनी हे ट्विट केलं.
Thought of the day 👇🏼 pic.twitter.com/PkLiHS3GVW — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) November 10, 2021
Thought of the day 👇🏼 pic.twitter.com/PkLiHS3GVW
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) November 10, 2021
देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं हे ट्विट म्हणजे जगप्रसिद्ध इंग्रजी लेखक जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या पुस्तकातील एक कोट आहे. ‘मी फार आधीच शिकलोय की, डुकराशी कुस्ती खेळायची नसते. अशी कुस्ती खेळून तुम्ही स्वतः तर घाणीने माखून जाताच, पण यात डुकरालाच मजा येत असते.’
मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर हे ट्वीट करण्यात आल्यानं फडणवीस यांचं हे ट्विट म्हणजे नवाब मलिकांना दिलेलं उत्तर असल्याचं म्हटलं जातं आहे. तात्काळ आलेल्या या ट्विटमुळे वेगवेगळे तर्कही लढवले जात आहेत.
नवाब मलिक यांनी आज (10 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. फडणवीसांच्या संरक्षणात राज्यात बनावट नोटांचं रॅकेट चालवण्यात आल्याचा दावा मलिकांनी केला. तसंच मुन्ना यादव, रियाज भाटी, हाजी अराफत यांची नाव घेत फडणवीसांवर हल्लाबोल चढवला. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं ट्विट मलिकांना प्रत्युत्तर असल्याचं मानलं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App