Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- जनसुरक्षा विधेयक सर्वानुमते मंजूर; ते संविधानाला न मानणाऱ्या शक्तीविरोधात

Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Fadnavis महाराष्ट्र विधिमंडळाने मंजूर केलेले विशेष जन सुरक्षा विधेयक हे संविधानाला न मानणाऱ्या शक्ती विरोधात कारवाई करण्यासाठी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वांनुमते ते मंजूर करण्यात आले असून कायदा न वाजता यावर टीका करणाऱ्यांनी एकदा कायदा वाचावा. कायदा समजून घेतल्यानंतर कोणीही या विधेयकावर टीका करणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.Fadnavis

प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कायद्यासाठी सर्व प्रकारची लोकतांत्रिक प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यासाठी 25 लोकांची संयुक्त चिकित्सा समिती बनवण्यात आली होती. या समितीच्या सूचना देखील आपण समाविष्ट केल्या आहेत. सर्व पक्षीय नेत्यांसमोर हे विधेयक मांडले. प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. समितीने ज्या सूचना दिल्या, त्या सर्व सूचना त्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या. यासोबतच 12 हजार वेगवेगळ्या सूचना आल्या होत्या. त्यांचे देखील पालन करून तसे बदल आपण केले आहेत. तसेच दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा झाल्यानंतर हे बिल मंजूर झाले असल्याचे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.Fadnavis



उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा

भारताच्या संविधानाला न मानणाऱ्या शक्तींवर आपल्याला आता कारवाई करता येईल. काही लोक आजही न वाचता, एकही अक्षर माहिती करून न घेता, त्याला विरोध करत आहेत. वास्तविक या बिलानुसार आता एक मंडळ तयार करण्यात आले आहे. आधी त्यांच्यापुढे पुरावे घेऊन जावे लागणार आहे. त्यांनी पुरावे मान्य केल्यानंतरच संघटनेवर बंदी आणता येईल. इतकेच नाही तर संबंधीत संघटनेला 30 दिवसाच्या आत उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा देखील देण्यात आली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

उज्ज्वल निकम यांचे अभिनंदन

अतिशय नामवंत विधिज्ञ आणि ज्यांनी अनेक केसेस देशाकरता आणि देशाच्या शत्रू विरुद्ध लढवल्या. त्यांच्या प्रयत्नातून अनेक दहशतवादी, आतंकवादी आणि गुन्हेगार यांना शिक्षा मिळाली. असे ॲड. उज्वल निकम यांना भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नामांकित केले याचा अतिशय आनंद असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. माननीय राष्ट्रपती महोदया आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे देखील यासाठी विशेष आभार मानत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

राष्ट्रभक्तीच्या भावनेने लढत राहतील

सातत्याने देशाच्या बाजूने उभे राहणारे आणि गुन्हेगारांच्या विरोधात उभे राहणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ व्यक्तीला राज्यसभेवर पाठवले गेले पाहिजे. याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. आता ते राज्यसभेचे सदस्य होत आहे, याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आभार मानतो. असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. देशाच्या संसदेपासून न्याय-पालिकेपर्यंत राष्ट्रभक्तीच्या भावनेने ते अशाच प्रकारे देशाच्या आणि समाजाच्या शत्रू विरोधात लढत राहतील, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Jansuraksha Bill Unanimously Passed, Against Forces Not Respecting Constitution: Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात