फडणवीस सावजी सारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड; एकनाथ शिंदेंची स्तुतीसुमने

Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केलेल्या भाषणावर आधारित भारतीय संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल‌ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते संपन्न झाला. Eknath Shinde

संविधान समजून घेणारा आणि ते सर्वसामान्यांना सहज समजेल अशा भाषेत मांडणारा देशात दुसरा मुख्यमंत्री नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. देवेंद्र यांच्या कायद्याचा दांडग्या अभ्यासाचा, अर्थशास्त्रातील सखोल पकडीचा आणि प्रशासन हाताळण्यातील कौशल्यामुळेच नगरसेवक, महापौर, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असा प्रवास करणे त्यांना शक्य झाल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.



देवेंद्र फडणवीस हे सावजी सारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड आहेत. गंभीर परिस्थितीतही शांत, स्थिर आणि थंड डोक्याने निर्णय घेण्याची त्यांची क्षमता अद्वितीय आहे. कर्करोगाने वडिलांचे निधन झाल्यानंतर नागपुरात कॅन्सर हॉस्पिटल उभारून कॅन्सरग्रस्त रुग्णांना आधार देणारा हा हळवा माणूस आम्ही पाहिला आहे,

२०२२ साली केलेल्या उठवावेळी निर्णायक क्षणी त्यांनी दिलेल्या मित्रत्वपूर्ण आधारही मोलाचा असल्याचे यावेळी सांगितले. अमिताभ बच्चन ज्याप्रमाणे बॉलिवूडचे ‘बिग बी’ आहेत, त्याप्रमाणे देवेंद्रजी सभागृहाचे ‘बीग डी’ आहेत असे सांगताना त्यांच्या ठायी Dedication, Determination, Discipline आणि Devotion सारे काही असल्याचे कौतुकोद्गार देखील शिंदे यांनी याप्रसंगी काढले.

त्यांच्या या पुस्तकाचा प्रसार सर्व भाषांत व्हावा, राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि ग्रंथालयात ते उपलब्ध व्हावे आणि राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ते संदर्भग्रंथ म्हणून वापरावे अशी अपेक्षा देखील याप्रसंगी व्यक्त केली.

यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, विधानसभेचे अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Fadnavis is as spicy as Savji and as sweet as Nagpuri orange; Praise for Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात