नाशिक : Fadnavis महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी घेतलेल्या मैत्रीपूर्ण लढतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संयमाची अपेक्षा केली होती. प्रत्यक्षात त्यांचा संयम ढळला आणि अजितदादांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप केले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये वेगळी स्ट्रॅटेजी करावी लागली.Fadnavis
पण मुळात काँग्रेस बरोबर सत्तेवर राहून काँग्रेस वरच दादागिरी करणाऱ्या अजितदादांकडून देवेंद्र फडणवीस यांनी संयमाची अपेक्षा ठेवलीच कशी??, आतापर्यंत अजितदादा मित्र पक्षांसमवेत तसेच वागलेत, हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती नाही का??, असे सवाल या निमित्ताने समोर आले.Fadnavis
– पवारांचा जरा इतिहास तरी पाहा
शरद पवार असोत किंवा अजित पवार असोत, दोघांनीही कायमच मित्र पक्षांच्या सत्तेच्या वळचणीला राहून मित्र पक्षांनाच पोखरले आणि स्वतःचे राजकारण साधून घेतले. हा फार जुना इतिहास नाही. फडणवीस यांची राजकीय कारकीर्द सुरू होताना पासूनचा हा इतिहास आहे. तरी देखील देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या दबावामुळे आणि “अदानी फॅक्टर” मुळे पवार नावाच्या फॅक्टरीशी जुळवून घ्यावे लागले पण म्हणून पवार नावाचा फॅक्टर बधेल आणि आपला विश्वासघातकी मूळ स्वभाव सोडून तो मित्र पक्षांशी मैत्रीच्याच नात्याने मागील ही अपेक्षा करणे मुळात चूक होते. ती चूक फडणवीस यांनी केली. त्यामुळेच मी संयम पाळला पण अजितदादांचा संयम ढळला म्हणूनच त्यांनी भाजपवर टीका केली याची कबुली फडणवीस यांना मुलाखतीत द्यावी लागली.
– काँग्रेसला पोखरणे हाच पवारांचा उद्योग
वास्तविक शरद पवार आणि अजितदादांनी स्वतःचा पक्ष कधीच स्वबळावर वाढविला नाही. त्यांनी काँग्रेस पोखरूनच काँग्रेसच्या नेत्यांना फोडूनच स्वतःचा पक्ष वाढविला. ठिकठिकाणीच्या सरदार दरकदारांना आपल्या पक्षात आश्रय दिला. काँग्रेसने गरजेपोटी पवार फॅक्टरने जवळ केले होते पण पवार फॅक्टरने इतर विरोधकांपेक्षा काँग्रेस नावाच्या मित्र पक्षालाच पोखरले. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या मुख्यमंत्र्यांना अजित पवारांनी त्रास दिला त्यांच्यावर दादागिरी केली पृथ्वीराज चव्हाण वगळता इतर मुख्यमंत्र्यांना ती दादागिरी मुकाटपणे सहन करावी लागली. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी पवार फॅक्टरच्या दादागिरीवर जोरदार तडाखा हाणला होता. 70000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप जरी देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, तरी प्रत्यक्षात त्याची कागदपत्रे आणि त्याचे मूळ पुरावे पृथ्वीराज चव्हाण यांनीच लोकांसमोर आणले होते. फायलींवर सही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय, अशी अश्लाघ्य शरद पवारांनी केली होती. याचा अर्थ शरद पवारांना हवी असलेली कामे पृथ्वीराज चव्हाण करत नव्हते. पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांना सुद्धा जेरीस आणले होते.
– पृथ्वीराज चव्हाणांनी दिला होता दणका
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारखा पाहिजे. त्यांनी ज्या पद्धतीने पवार फॅक्टरला जेरीस आणले, त्या पद्धतीने फडणवीसंनी पवार फॅक्टरला जेरीस आणायला पाहिजे. कारण भाजपची सत्ता टिकवण्यासाठी फडणवीसांना अजित पवारांची गरज नाही, तर सत्तेच्या वळचणीला बसून राहण्यासाठी आणि वेगवेगळ्या घोटाळ्यांमधून आपली मान सोडवण्यासाठी अजित पवारांना भाजपच्या सत्तेची गरज आहे. उगाच अजितदादांसारख्या नेत्यांकडून संयमाची अपेक्षा करणे ही राजकीय चूक आहे. ती फडणवीसांच्या वेळीच लक्षात आली म्हणून ठीक आहे, पण अजितदादा आणि पवार फॅक्टरला वेळीच वेसण घालणे आवश्यक आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका संपल्यानंतर ते लवकरात लवकर करणे अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App