‘’तुम्ही जे सांगता की महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार, तो हाच कर्नाटक पॅटर्न आहे का?’’ फडणवीसांचा महाविकास आघाडीला सवाल!

कर्नाटक राज्य सरकारच्या निर्णयावरून उद्धव ठाकरेंवरही साधला आहे निशाणा, जाणून घ्या काय म्हटले आहे?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादी विचारांना तिलांजली देत आहे. कर्नाटक मधल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी विचारसरणीचा साधा अभ्यास देखील करू नये यासाठी काँग्रेस सरकारने चंग बांधला आहे. त्यामुळेच सिद्धरामय्या यांच्या सरकारने कर्नाटक मधल्या अभ्यासक्रमांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे धडे वगळले आहेत. यावरून आता भाजपाही आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे  आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. Fadnavis criticizes Maha Vikas Aghadi and Uddhav Thackeray after Karnataka Govt drops Savarkar Hedegevar lessons from syllabus

https://youtu.be/bj-f-pRa7iY

फडणवीस म्हणाले, ‘’एखादा धडा तुम्ही वगळू शकता, पण लोकांच्या मनातून तुम्ही वीर सावरकर काढू शकत नाही, तुम्ही हेडगेवार काढू शकत नाही. तुम्ही एकही स्वातंत्र्यसंग्राम सेनानी लोकांच्या मनातून काढू शकत नाही.परंतु, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर यापेक्षा वेगळे काहीच अपेक्षित नाही. केवळ अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करण्याकरता, ज्या प्रकारचे निर्णय कर्नाटक सरकार घेत आहे, माझा महाविकास आघाडीला सवाल आहे. तुम्ही जे सांगता की महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार, तो हाच कर्नाटक पॅटर्न आहे का?’’

याशिवाय ‘’माझा सवाल उद्धव ठाकरेंना आहे. आता तुमची प्रतिक्रीया नेमकी काय आहे, ते सांगा. ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात ते जर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव पुसायला निघाले आहेत, धर्मांतरणाला पूर्णपणे समर्थन द्यायला निघाले आहेत. यावर आता तुमचे नेमके मत काय आहे, हे देखील तुम्ही सांगितले पाहिजे. सत्तेकरता हा समझोता केला का?’’ असंही फडणवीसांनी सांगितलं आहे.

Fadnavis criticizes Maha Vikas Aghadi and Uddhav Thackeray after Karnataka Govt drops Savarkar Hedegevar lessons from syllabus

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात