Devendra Fadanvis : फडणवीसांची मोठी घोषणा- UPSCच्या धर्तीवर MPSC भरती प्रक्रियेतही कॅलेंडर; परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात

Devendra Fadanvis

प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadanvis यूपीएससीच्या धर्तीवर राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत देखील कॅलेंडर निश्चित केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. एमपीएससीची परीक्षा या वर्षीपासून आपण डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. यासाठी काही नागरिकांचा विरोध आहे. मात्र हा विरोध ग्राह्य धरणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे. लवकरच एमपीएसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भरती करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.Devendra Fadanvis

एमपीएससी मध्ये मनुष्यबळ कमी असल्याने स्पर्धा परीक्षेची सर्व प्रक्रिया होऊन देखील उमेदवारांची पोस्टिंग होत नाही. याशिवाय पोस्टिंग देण्यासाठी काही व्यवहार होतात, असा आरोप आमदार विक्रम काळे यांनी सभागृहात केला होता. त्यावर देवंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. अलीकडच्या काळात एमपीएससीमधील सर्वच पदे हे लवकर भरले गेले आहेत. सध्या तीन पदे रिक्त आहेत. ते आपण तात्काळ भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यात एमपीएससी मार्फत मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. परीक्षेचा निकाल लागला, तेव्हापासून आपण वेगाने काम केले असून यापुढे देखील वेगाने काम करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.



भविष्यात एमपीएससी मार्फत मोठी भरती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यूपीएससी प्रमाणे एमपीएससी मध्ये देखील कॅलेंडर असेल, असे देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. या संदर्भात आमदार शिवाजीराव गर्जे यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.

एमपीएससी मंडळात ज्या जागा रिक्त आहेत, त्यापैकी एक जागा पूर्ण भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर उर्वरित दोन जागांची आपण जाहिरात देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. दरम्यान या संदर्भात अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री यांना पत्र दिले असल्याची माहिती देखील देण्यात आली. त्यामुळे आता एमपीएससीच्या माध्यमातून लवकरच मोठ्या प्रमाणात भरती होणार असल्याचे मुख्यमंत्री सभागृहात सांगितले आहे.

Fadnavis’ big announcement – MPSC recruitment process will also have a calendar on the lines of UPSC; Exam will be in descriptive format

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात