झ्युरिक मधल्या विवानचे फडणवीस झाले फॅन; लाडक्या बहिणींबरोबरचा फोटो आणि व्हिडिओ देखील केला शेअर!!

Devedra Fadanvis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : झ्युरिक मधल्या विवानचे देवेंद्र फडणवीस झाले फॅन; लाडक्या बहिणींबरोबरचा फोटो आणि व्हिडिओ केला शेअर!!, असे आज स्वित्झर्लंड मध्ये घडले.Fadnavis became a fan of Vivaan in Zurich; also shared a photo and video with his beloved sisters!!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी दावोसमध्ये दाखल झाले. त्याआधी झ्युरिक मध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाने ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. तिथल्या छोट्या मुलांनी आणि भगिनींनी कुमकुम तिलक लावून फडणवीसांना ओवाळले. तिथल्या महाराष्ट्र मंडळाच्या अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या कला सादर करून फडणवीस आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या शिष्टमंडळाचे स्वागत केले.



त्यावेळी छोट्या विवान साठे याने सूर निरागस हो हे गाणे सर्वांसमोर सादर केले. हे गाणे फडणवीसांना एवढे आवडले की त्यांनी त्या गाण्याचा व्हिडिओ आणि विवानबरोबरचा आपला फोटो आपल्या स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला. आज मी फॅन झालो आहे या छोट्याशा विवानचा!!, असे त्यांनी सोशल मीडिया हँडलवर लिहिले. त्यामुळे यूरिक मध्ये राहणारा छोटा विवान महाराष्ट्रासह सर्वदूर पोहोचला.

यावेळी बृहन महाराष्ट्र मंडळाच्या भगिनींनी लेझीमची प्रात्यक्षिके सुद्धा सादर केली. या सगळ्या बहिणी बरोबर देवेंद्र फडणवीस आणि फोटो काढला आणि झ्युरिक मधल्या माझ्या लाडक्या बहिणी असे फोटो कॅप्शन त्याला दिले.

Fadnavis became a fan of Vivaan in Zurich; also shared a photo and video with his beloved sisters!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात