विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे सध्याचे तीन सदस्यांचे मंत्रिमंडळ अधिकाररूढ झाले. त्यापाठोपाठ मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली महायुतीतल्या तीन पक्षांपैकी कोणाला किती मंत्री पदे याविषयी अधिकृत माहिती कुठल्याही पक्षांनी दिली नाही, पण म्हणून माध्यमांनी ती चर्चा थांबविली नाही. आपापल्या वकुबानुसार माध्यमे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा घडवतच राहिली. त्या तीन पक्षांमधल्या खऱ्या – खोट्या संघर्षाच्या कहाण्या पेरून झाल्या. Fadnavis & Ajit pawar goes to delhi for cabinet
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर गेलेत मंत्रिमंडळाची संभाव्य यादी त्यांच्याबरोबर असल्याचे बोलले जात आहे. त्यात मंत्रिपदे जास्तीत जास्त खेचून घेण्यासाठी दिल्लीत लॉबिंग सुरू असल्याच्या बातम्या माध्यमांनी चालविल्या आहेत.
Devendra Fadnavis : पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन
पण फडणवीस आणि अजितदादा आपापल्या मंत्र्यांची यादी घेऊन दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत. त्या दिल्ली दरबारात म्हणजेच मोदी शाहांकडे असले कुठले लॉबिंग चालत नाही. खुद्द मोदी आणि शाह यांचाच गृहपाठ एवढा पक्का असतो, की तिथे कुठला संघर्ष खेचाखेच याला वावच शिल्लक राहत नाही. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांबरोबरच अजितदादांचे किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री आणि त्यांची खाती हे मोदी आणि शाह हेच ठरवतील. यापेक्षा वेगळे घडण्याची सुतारम शक्यता नाही.
एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे काही स्वतःच्या “टर्म्स अँड कंडिशन्स”वर महायुतीत आलेले नाहीत. भाजपने त्यांना स्वतःच्या “टर्म्स अँड कंडिशन्स”वर महायुतीत घेतले आहे. शिंदेंना अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद देऊन भाजपने आपली आधीची कमिटमेंट पूर्ण केली आहे. त्यामुळे इथून पुढे भाजपचे हायकमांड त्यांच्या कुठल्या दबावाखाली येण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रातली आकडेवारी देखील शिंदे किंवा अजितदादांना फारशी अनुकूल नाही, तर ती भाजपला अनुकूल आहे. त्यामुळे फारतर शिंदे आणि अजितदादांच्या काही विशिष्ट मागण्या भाजपचे हायकमांड विशिष्ट मर्यादेपर्यंत किती ऐकून घेईल. पण मंत्रिमंडळाच्या रचने संदर्भात आणि नावांसंदर्भात अंतिम निर्णय मोदी आणि शाह हेच घेतील. तो फडणवीस + शिंदे आणि अजितदादा यांना मान्य करावा लागेल. या पलीकडे फडणवीस आणि अजितदादांच्या दिल्ली दौऱ्यात फारसे काही घडण्याची शक्यता नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App