Fadanavis Pendrive Bomb : कालचा तर पहिलाच “व्हिडिओ बॉम्ब” होता, अनेक “बॉम्ब” वेळोवेळी फुटणार; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

प्रतिनिधी

मुंबई : काल तर पहिला “व्हिडिओ बॉम्ब” फुटला आहे. अजून बरेच व्हिडिओ बॉम्ब आमच्याकडे आहेत. योग्य वेळ येताच ते बॉम्ब एकापाठोपाठ एक फुटतील, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानात भाजपच्या मोर्चाच्या वेळी दिला.Fadanavis Pendrive Bomb: Yesterday was the first “video bomb”, many “bombs” will explode from time to time; Devendra Fadnavis’s warning

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत राज्य सरकारवर व्हिडिओ बॉम्ब टाकत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. भाजपच्या नेत्यांविरोधात राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी  पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना सुपूर्द केला.



स्टिंग ऑपरेशनचे फुटेज 125 तासांचे आहे. काल तर फक्त भाजपने 2 तास 36 मिनिटांचे फुटेज जारी केले होते. अजून तब्बल 122 तासांचे फुटेज जारी व्हायचे आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याकडे अजून बरेच “बॉम्ब” आहेत, असा इशारा दिला आहे

सरकारने विरोधकांना संपवण्याचा कट रचला असून यात सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांची मदत घेतली होती. स्वत: सरकारी वकिलांनी याची माहिती दिली असून याचे व्हिडिओ पेन ड्राईव्हमध्ये असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना संपण्याचा कसा कट रचला गेला आहे. याचे पुरावेच देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

आमच्याविरोधात षडयंत्र करताय, काल तुमचे षडयंत्र उघड केले आहे. पण आम्ही घाबरणारे नाही. आम्ही मोदींचे सैनिक आहोत. एका नरेंद्र मोदींना संपवण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र आला आहात, पण मोदींजींना संपवू शकला नाहीत, कारण त्यांच्या पाठीशी करोडो लोकांचे आशिर्वाद आहेत.

कालचा बॉम्ब तर पहिला बॉम्ब आहे, असे अनेक बॉम्ब ठेवले आहेत, ज्या ज्यावेळी आवश्यक आहेत त्यावेळी ते बॉम्ब फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

मुंबई करता, महाराष्ट्र करता, संपूर्ण देशाकरता, संघर्ष करण्याकरता आझाद मैदानावर उपस्थित आहात. हा साधा संघर्ष नाहीए, हा  देशभक्तांचा संघर्ष आहे, देशद्रोह्यांविरोधात हा संघर्ष आहे, पाकिस्तानधार्जिण्या लोकांविरोधात हा संघर्ष आहे. दाऊदच्या साथीदारांविरोधात हा संघर्ष आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

अनिल देशमुख, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेला तर नवाब मलिकांचा राजीनामा का नाही??, हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालतं का? हा आमचा सवाल आहे. कोणाच्या दाढ्या कुरवाळताय म्हणून तुम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही. हे आम्हाला समजले पाहिजे,

पण तुम्ही राजीनामा घेतला नाही तर आम्ही संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत देशद्रोह्याचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

Fadanavis Pendrive Bomb: Yesterday was the first “video bomb”, many “bombs” will explode from time to time; Devendra Fadnavis’s warning

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात