Fadanavis Pendrive Bomb : सरकारी वकील प्रवीण चव्हाण आज सकाळपासून “गायब”!!; पुण्यात पवारांचे निवासस्थान 1 मोदीबागेजवळच चव्हाणांचेही निवासस्थान

प्रतिनिधी

पुणे : भाजपच्या अनेक नेत्यांना विविध प्रकरणांमध्ये अडकवण्या संदर्भात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतर पहिल्यांदाच या मुद्द्यावर प्रतिक्रिया देणारे सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण आज मात्र दिवसभर “गायब” झाले आहेत.Fadanavis Pendrive Bomb: Public Prosecutor Praveen Chavan has been “missing” since this morning !!; Pawar’s residence in Pune 1 Chavan’s residence near Modibage

विविध प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात येते. प्रवीण पंडीत चव्‍हाण हे पुण्यामध्ये शरद पवार यांचे निवासस्थान 1 मोदीबाग सोसायटी जवळच हिरवाई बिल्डिंगमध्ये राहतात.



आज सकाळी जेव्हा प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालय आणि निवासस्थानावर गेले तेव्हा दोन्ही ठिकाणी त्यांना कुलपे आढळली. त्यांना मोबाईलवरून संपर्क केला तेव्हा ते नॉट रिचेबल असल्याचे सांगण्यात आले. आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधींनी ही बातमी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर प्रवीण चव्हाण यांनी काल पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना संबंधित व्हिडिओ आणि ऑडिओ मॉर्फ्ड असल्याचे सांगितले होते. या फुटेजची फॉरेन्सिक लॅबरोटरी कडून तपासणी करून घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र काल ही प्रतिक्रिया दिल्यानंतर आज सकाळपासून प्रवीण चव्हाण नेमके कुठे आहेत हे मात्र कोणाला समजले नाही.

शरद पवार यांचे पुण्यातील निवासस्थान 1 मोतीबाग याच्या जवळच असलेल्या हिरवाई बिल्डिंगमध्ये प्रवीण चव्हाण यांचे निवासस्थान आहे. त्यांच्याकडे केसस असलेले अनेक आशील आज दिवसभर त्यांच्याकडे येऊन गेले. परंतु दरवाजा बंद असल्याने त्यांना परत जावे लागले, असे बातम्यांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Fadanavis Pendrive Bomb: Public Prosecutor Praveen Chavan has been “missing” since this morning !!; Pawar’s residence in Pune 1 Chavan’s residence near Modibage

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात