#KISBU : अन् एका रात्रीत ती बनली इंटरनेट स्टार …केरळची किस्बू …एक फुगे विक्रेता ते एक मॉडेल -अंदलूरच्या गल्लीपासून लोकांच्या हृदयापर्यंत…


  • सोशल मीडिया हा असा प्लॅटफोर्म आहे जिथे कोणताही व्यक्ती कुठल्याही कारणामुळे प्रसिद्धी मिळवू शकतो. 

  • फक्त एका फोटोमुळे केरळमधील(Kerala) एका तरूणीचं आयुष्य बददलं आहे. या मुलीची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

  • पोटाची खळगी भरण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी उभे राहून फुगे विकणाऱ्या किस्बूची ही कहाणी…#KISBU: One night she became an internet star … Kisbu of Kerala … from a balloon seller to a model – from the streets of Andalur to the hearts of the people …

विशेष प्रतिनिधी

तिरुवनंतपुरम :एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही कहाणी… साधी फुगे विकणारी किस्बू… एक फोटोग्राफर तीला पाहतो आणि तिच्यातला चार्म  हेरून तीला फोटोशूट च ऑफर देतो… आणि बघता बघता फुगेवाली तरुणी  चक्क इंटरनेट स्टार  म्हणून सोशल मीडियवर धुमाकूळ घालते.#KISBU: One night she became an internet star … Kisbu of Kerala … from a balloon seller to a model – from the streets of Andalur to the hearts of the people …

https://www.instagram.com/p/CaexUNrsMmy/?utm_source=ig_web_button_share_sheet

केरळमध्ये रस्त्यावर फुगे विकणारी किस्बू सध्या सोशल मीडिया स्टार झाली आहे. तिचा फुगे विकतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रिपोर्टनुसार, अर्जुन कृष्णन या फोटोग्राफरनं केरळमधील अंडालूर कावु फेस्टिवलमध्ये किस्बूला पाहिलं. किस्बूला अर्जुननं मॉडेलिंग करण्यासाठी ऑफर दिली. रिपोर्टनुसार, किस्बू ही राजस्थानमधील आहे. ती केरळमध्ये फुगे विकण्याचं काम करते.

किस्बू…. १८- १९ वर्षांची तरुण मुलगी.. ही मुळची राजस्थानी. पण मागच्या अनेक वर्षांपासून ती केरळमध्येच राहते. घर चालविण्यासाठी ती फुगे विकते. एकदा नेहमीप्रमाणे ती तिचे काम करत होती.. कोणी फुगे घेईल का म्हणून मोठ्या आशेने अवतीभोवती पाहत होती. त्यावेळीच वेडिंग फोटोग्राफर अर्जून कृष्णन यांनी तिला हेरलं. तिची देहबोली, बोलका चेहरा आणि तेवढेच भावपूर्ण डोळे त्यांना आवडले. त्यांना तिचा चेहरा अतिशय फोटोजेनिक वाटल्याने त्यांनी तिच्या नकळत तिचे फोटो काढले. त्यानंतर त्यांनी हे फोटो किस्बू आणि तिच्या आईला दाखवले. त्यांनाही ते खूपच आवडले.

https://www.instagram.com/reel/Caj1YEwJNXD/?utm_source=ig_web_button_share_sheet

यानंतर ते फोटो अर्जूनच्या मित्राने पाहिले. ते सोशल मिडियावर शेअर केले. त्या फोटोंमध्ये एवढा चार्म होता की सोशल मिडियावर ते फोटो प्रचंड व्हायरल झाले आणि त्यावर अक्षरश: लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. म्हणूनच हा प्रतिसाद पाहून अर्जून यांनी किस्बूचा मेकओव्हर केला आणि त्यानंतर तिचे एकदम प्रोफेशनल फोटो शूट केले. photoman_official या इन्स्टाग्रामवर (instagram) पेजवर हे फोटो शेअर करण्यात आले असून त्याला ”From the street of andalur to peoples heart. And that smile in her face after the make over #KISBU” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या फोटोंमुळे सध्या किस्बू केरळमध्ये चांगलीच पॉप्यूलर आहे..

#KISBU: One night she became an internet star … Kisbu of Kerala … from a balloon seller to a model – from the streets of Andalur to the hearts of the people …

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात