Chandrashekhar Bawankule : खंडणीखोरांचे सरदार शंभर कोटींची वसुली आठवा, चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार

Chandrashekhar Bawankule

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Chandrashekhar Bawankule खंडणीखोरांचे सरदार आपणच आहात. उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवून तुमच्या नेतृत्वात शंभर कोटींची वसुली सुरू होती. जनता हे विसरली नाही. त्यामुळे फडणवीसांवर टीका करताना आपला भूतकाळ आठवा,असा पलटवार भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. Chandrashekhar Bawankule

उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून महायुती सरकारवर आरोप करत कथित मतचोरीवरून देवेंद्र फडणवीस हे चीफ नव्हे तर थीफ मिनिस्टर असल्याचाही आरोप केला होता. यावर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे, खंडणीखोरांचा सरदार कोण आहे? हे जनतेला माहिती आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत कोण ‘चीफ मिनिस्टर‘ आहे? आणि कोण ‘थीफ मिनिस्टर‘ हे देखील महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले आहे. वाझे काय लादेन आहे का? असे म्हणत उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवून तुमच्या नेतृत्वात शंभर कोटींची वसुली सुरू होती हे जनता विसरली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जरा आपला भूतकाळ आठवा आणि विचार करून बोला. Chandrashekhar Bawankule



बाकी इंडी आघाडीत तुमची शेवटच्या रांगेतील किंमत महाराष्ट्राने बघितली. आजही आपल्याला शेवटच्या रांगेत उभे राहावे लागेल म्हणून तुम्ही दिल्लीतील आंदोलनात गेला नाहीत आणि इथे चार टाळके घेऊन आंदोलन केले. तिकडे राहुल गांधींचे आंदोलन सुरू असताना आपली वेगळी चूल मांडून तुम्ही लक्ष वेधण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना लोकशाहीचा आणि नैतिकतेचा गळा घोटला होता. आज देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रामाणिक नेतृत्वावर बोट ठेवण्याआधी तुम्ही स्वतःला आरशात पाहायला हवे. देवेंद्र फडणवीस यांचे काम हे फक्त भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचे नाही, तर स्थिर, विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याचे आहे. महाराष्ट्रातील जनतेचा देवेंद्र यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. याऊलट तुम्हाला लोकं कंटाळले आहेत, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात