अंबानींच्या घरावर स्फोटके, शासकीय ठेकेदार संशयाच्या रडारवर

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणात एक शासकीय ठेकेदार संशयाच्या रडारवर असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणनेने (एनआयए) दिली आहे. ठेकेदार असल्यामुळे जिलेटिन कांड्या या ठेकेदाराला मिळविणे सोपे होते. त्याचबरोर तो या प्रकरणातील संशयित सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे याचा परिचितही आहे. Explosives at Ambani’s house, government contractor on suspicion radar


विशेष प्रतिनिधी

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणात एक शासकीय ठेकेदार संशयाच्या रडारवर असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणनेने (एनआयए) दिली आहे. ठेकेदार असल्यामुळे जिलेटिन कांड्या या ठेकेदाराला मिळविणे सोपे होते. त्याचबरोर तो या प्रकरणातील संशयित सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे याचा परिचितही आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ मोटारीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. अंबानी यांना घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, या प्रकरणाचा तपास करून हिरो बनण्यासाठी सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यानेच ही मोटार तेथे लावल्याचे उघड झाले आहे.



 

या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. एनआयएने सचिन वाझेला अटक करून चौकशीही सुरू केली आहे. त्याचबरोबर वाझेबरोबर आणखी काही पोलीस अधिकारीही गजाआड केले आहेत. त्यांच्याकडून केलेल्या तपासात एका शासकीय ठेकेदाराचे नाव समोर आले आहे.

या ठेकेदाराचा या कटातील सहभाग काय होता याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे. एनआयएतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील संशयितांच्या संपर्कात असलेल्या एका ठेकेदाराचा शोध घेण्यात आला आहे. शासकीय ठेकेदार असल्याने त्याला जिलेटिन मिळण्यास काहीही अडचण नव्हती. कारण शासकीय प्रकल्पांसाठी ते मिळविणे त्याच्यासाठी सोपे होते. अंबानींच्या घरासमोर मोटारीत ठेवण्यासाठी त्यानेच जिलेटिन पुरविले का? याबाबत तपास करण्यात येत आहे.

Explosives at Ambani’s house, government contractor on suspicion radar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात