‘’देवेंद्र फडणवीस कधीही कोणाला भेट टाळत नाहीत.’’ असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
पुणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवल आहे. ज्यामध्ये त्यांनी सरकारमधील काही नेत्यांचा बाजारबुणगे असा उल्लेख करत भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. तसेच कर्तव्यदक्ष गृहमंत्री फडणवीस या बाजारबुणग्यांवर कठोर कारवाई कधी करणार? असा सवालही केला आहे. हे पत्र त्यांनी ट्विटरवरही शेअर केले आहे. यावर भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Every allegation of Sanjay Raut is not to be taken seriously Chandrakant Patil
पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘’महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे कार्यकुशल नेते आहेत. देवेंद्र फडणीस कितीही व्यस्त असले तरी संजय राऊत यांच्या पत्राला ते नक्कीच सक्षम असे उत्तर देतील.’’
याशिवाय, ‘’संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस कधीही कोणाला भेट टाळत नाहीत. अधिवेशन इतकं जोरदार चाललं, जवळजवळ इतिहासात पहिल्यांदा इतक्या दिवसांचं अधिवेश चाललं. त्यामुळे व्यस्त दिनक्रमातून त्यांनी वेळ दिला नसेल, पण संजय राऊतांच्या प्रत्येक आरोपाला गांभीर्याने घ्यायचं नसतं, असं झालंही नसेल आणि झालं असेल तर देवेंद्र फडणवीसांची सध्या प्रचंड व्यस्तता आहे, त्यामुळे राहिलं असेल. ते त्यांना वेळ देतील.’’ असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
संजय राऊत काय म्हणाले? –
‘’मोदी हे सूर्यच आहेत. चंद्र आहेत. धुमकेतू आहेत. सर्वकाही आहेत. पण त्यांनी गेल्या काही काळात निरमा वॉशिंग पावडरचं उत्पादन सुरू केलं आहे, आम्ही बाजारबुणगे आहोत, मग तुम्ही कोण आहात? गौतम अदाणीला का वाचवत आहात? किरीट सोमय्याला संरक्षण कोण देतंय? यावर देवेंद्र फडणवीसांनी बोलावं.’’, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे कार्यकुशल नेते आहेत.देवेंद्रजी कितीही व्यस्त असले तरी संजय राऊत यांच्या पत्राला ते नक्कीच सक्षम असे उत्तर देतील.@CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @cbawankule pic.twitter.com/KI9D01UADA — Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) April 4, 2023
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे कार्यकुशल नेते आहेत.देवेंद्रजी कितीही व्यस्त असले तरी संजय राऊत यांच्या पत्राला ते नक्कीच सक्षम असे उत्तर देतील.@CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @cbawankule pic.twitter.com/KI9D01UADA
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) April 4, 2023
याचबरोबर फडणवीसांना पाठवलेलं पत्र ट्वीट करत संजय राऊतांनी ‘’महाराष्ट्राचे कर्तबगार, कर्तव्य तत्पर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी केलेली विनंती. बाजार बुणगे सरकारात आहेत. आपल्या सोबत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई कधी करणारं?’’ असा सवालही केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App