प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात आता इथून पुढे जे काही असेल ते लेखी द्यावे. त्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असे राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे यांनी आज महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीच्या वेळी स्पष्ट केले.Even after the visit of Home Minister Valse Patil, Sambhaji Raje insisted on fasting !!
नामदार वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांचेसह मराठा समन्वयकांशी चर्चा केली व छत्रपती संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र छत्रपती संभाजीराजेंनी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची घोषणा केली…. — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 27, 2022
नामदार वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांचेसह मराठा समन्वयकांशी चर्चा केली व छत्रपती संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र छत्रपती संभाजीराजेंनी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची घोषणा केली….
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 27, 2022
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची तब्येत खालावली आहे. त्यांचा रक्तदाब कमी झाला आहे. डोके आणि हात, पाय देखील दुखत आहेत. परंतु ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत. दिलीप वळसे-पाटील यांनी सरकारच्या वतीने सरकारच्या वतीने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. चर्चा सकारात्मक झाली. तरी देखील जे काही असेल ते आता मराठा समाजाला लेखी द्या, अशी आग्रही मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.
मराठा समाजाच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीराजे आमरण उपोषणास बसले आहेत. आज दि. २७ फेब्रुवारी रोजी सायं. ६ वा. राज्य सरकारच्या वतीने गृहमंत्री दिलीप पाटील हे आझाद मैदान येथे उपोषणस्थळी आले. … pic.twitter.com/MhrLCbUN2F — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 27, 2022
मराठा समाजाच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीराजे आमरण उपोषणास बसले आहेत. आज दि. २७ फेब्रुवारी रोजी सायं. ६ वा. राज्य सरकारच्या वतीने गृहमंत्री दिलीप पाटील हे आझाद मैदान येथे उपोषणस्थळी आले.
… pic.twitter.com/MhrLCbUN2F
त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी आजच्या चर्चे संदर्भात आपण स्वतः मुख्यमंत्र्यांशी पुढाकार घेऊन चर्चा करू आणि लवकरात लवकर निर्णय कळवू असे आश्वासन देऊन ते तेथून निघाले. यानंतर ठाकरे – पवार सरकारमधील मंत्र्यांच्या भेटीगाठींना वेग आला असून लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App