विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार अनेकदा परखड पण खरे बोलून जातात. काही बाबतीत ते कोणाचा मुलाहिजा ठेवत नाहीत. आज असाच प्रकार कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घडला. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन होऊन 25 वर्षे झाली तरी पक्ष अजून स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेवर येऊ शकला नाही. याचा अर्थ आपणच कुठेतरी कमी पडलो. कधीतरी मागे वळून आत्मपरीक्षण केले पाहिजे, अशा शब्दांत अजितदादांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले, पण त्याचवेळी अप्रत्यक्षपणे आपल्याच पक्ष नेतृत्वाचे पुरते वाभाडे काढले. Even after 25 years, NCP is not in power on its own
राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जून 2023 रोजी पंचविशीत म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्षात प्रवेश केला. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपद सोपवून भाकरी फिरवली. मात्र या भाकरी फिरवण्यामधून अजितदादांच्या वाट्याला पक्ष संघटनेतले कोणतेही काम आले नाही.
या पार्श्वभूमीवर अजितदादांनी पक्ष कार्यकर्त्यांना परखड बोल सुनावले. पण पक्ष नेतृत्वाचे अप्रत्यक्षपणे वाभाडे काढले. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन होऊन 25 वर्षे झाली, तरी पण राज्यात आपल्याला स्वबळावर सत्ता खेचून आणता आलेली नाही. आपणच कुठेतरी कमी पडलो. विदर्भात, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कुठे आहे?, कार्यकर्ते नुसत्याच घोषणा देतात. पण त्यांच्या वार्डात राष्ट्रवादीचा साधन नगरसेवक निवडून आणू शकत नाहीत आपणच यात कुठेतरी कमी पडतो. पश्चिम महाराष्ट्रात आपण चांगले पाय रोवले. उत्तर महाराष्ट्रातही यश मिळवले पण विदर्भ मुंबईत आपल्याला ते मिळवता आले नाही. आपल्याला कुठे दिल्लीत विचारायला जायचे आहे. आपल्याला इथेच मुंबईत शरद पवारांशी चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे, असे अजित दादा म्हणाले.
त्याच वेळी आपण विरोधी पक्ष नेते व्हावे असे नेत्यांना वाटले त्यांनी सह्या केल्या म्हणून त्या पदावर गेलो. अन्यथा पक्ष संघटनेत आपल्याला कुठलेही पद द्या. आपण त्या पदाला न्याय देऊ. पक्ष चालवू, अशी मागणी देखील अजितदादांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे केली.
https://youtu.be/CILI6WkeDLs
अजितदादांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली असून अजितदादांची महत्त्वकांक्षा नेमकी आहे तरी काय??, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांनी भाकरी फिरवताना प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष केले. खासदार सुनील तटकरे यांना पक्षाचे खजिनदार केले. जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांना अन्य काही राज्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या. पण या सर्व राजकीय घडामोडीत अजितदादांच्या वाट्याला मात्र पक्ष संघटनेत कोणतेही पद आलेले नाही. या पार्श्वभूमीवर अजितदादांनी कार्यकर्त्यांचे कान टोचतानाच 25 वर्षे झाली तरी महाराष्ट्रात राष्ट्रवादीला स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नाही, असे राष्ट्रवादी अशा शब्दात राष्ट्रवादीच्याच नेतृत्वाचे अप्रत्यक्षपणे वाभाडे काढले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईत आज कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार यांनी आपली इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी नको. तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी द्या. आपल्याला कोणतीही जबाबदारी मिळाली तरी आपण तिला न्याय देण्याचा प्रयत्न करु, असं अजित पवार भर कार्यक्रमात म्हणाले आहेत.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“मला विरोधी पक्षनेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. पण आमदारांनी आग्रह केला. त्यांनी सह्या केल्या. नेतेमंडळींनी देखील सांगितलं की तू विरोधी पक्षनेता होता. त्यामुळे मी त्यांच्याखातर या पदाची जबाबदारी घेतली. मी एक वर्ष विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळली आहे. ते सांभाळत असताना काहींचं म्हणणं आहे की, तू कडक वागत नाही. आता त्यांची गचोडी धरु का? पण आता बस झालं”, असं अजित पवार म्हणाले.
“मला त्यातून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या. मग कशापद्धतीने पक्ष चालतो ते बघा. अर्थात हा नेतेमंडळींचा अधिकार आहे. पण माझी इच्छा आहे. बाकी अनेकजण वेगवेगळ्या इच्छा व्यक्त करतात. मी आज माझी इच्छा व्यक्त केली आहे. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी पार पाडलेली आहे. मला संघटनेत कोणतंही पद द्या. तुम्हाला जे पद योग्य वाटेल ते द्या. त्या पदाला योग्य न्याय मिळवून देईन”, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले
यावेळी भाषण करताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे देखील कान टोचले. “आपण आपल्या एकट्याच्या ताकदीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेवर निवडून येऊ शकलेला नाहीय. यासाठी आपणच कुठेतरी कमी पडलो आहोत. आपण विदर्भामध्ये कमी पडतो. आपण मुंबईत कमी पडतो. मुंबईत आजदेखील काय अवस्था आहे? आपण 25 वर्षे पूर्ण करुन 26 व्या वर्षात पदार्पण केलंय. पण अजूनही मुंबईचा अध्यक्ष नाहीय. आपल्याला दिल्लीला कुणाला विचारायला जायचंय?”, असा सवाल त्यांनी केला.
“आपल्याला निर्णय तर महाराष्ट्रातच घ्यायचाय. इथे आपल्या राष्ट्रवादी भवनमध्ये घ्यायचा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर मान्यवरांशी चर्चा करायची आहे. काय आपण कमी पडलो? कशामुळे कमी पडलो? कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आपण वर्चस्व निर्माण केलं. उत्तर महाराष्ट्रातही आपण चांगलं यश मिळवलं. आपण आज आनंदाचा दिवस साजरा करत असताना थोडं पाठीमागे वळून आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे मत अजित पवार यांनी मांडलं.
अजित पवार यांनी यावेळी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याचे कान टोचले. तुझ्या वॉर्डात राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे का? किंवा ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता मिळवली आहे का? असा प्रश्न अजित पवार यांनी केला.
आज नवीन कार्यकर्ते पुढे येत आहेत. वेगवेगळ्या विविध सेल काम करत आहेत. आता त्या सेलमध्ये बदल करायचा की नाही? कुठे पस्तीशी आहे ते फार चाळीशीपर्यंत गेलं आहे. आता तिथे बदल करा. मी इतक्या वेळी सांगतो, कुणाचा तिथे इंट्रेस्ट अडकला आहे ते तरी समजू द्या. भाकरी फिरवायची झाली तर फिरलीच पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
“ज्या कार्यक्रमाला काहीतरी मोठं आणि वजनदार गिफ्ट दिलं तर समजावं इथे बराच काहीतरी घोटाळा झालेला आहे. त्या वजनानेच मी किंवा नेतेमंडळी दबलो पाहिजे, असले प्रकार चालतात. जो काम करतो तो कामच करत राहतो”, असं अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App