जाणून घ्या, नितीन गडकरींनी भाषणातून नेमका काय दिला आहे संदेश
विशेष प्रतिनिधी
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे भाषण ऐकून व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळालेल्या यशस्वी मराठी उद्योजिका जयंती कठाळे यांचा नितीन गडकरी यांच्यासाठी व्हिडिओ आणि व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून भावनिक संदेश दिला आहे. जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जाणून घेऊयात नितीन गडकरींबद्दल नेमक्या काय भावना व्यक्त केल्या आहेत आणि नितीन गडकरींना काय म्हटलं होतं? Entrepreneur Jayanti Kathale emotional letter to Nitin Gadkari
‘’मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, असं एक वाक्य बोललं जातं होतं. मराठी माणूस तर सोडा, एक स्त्री उभी आहे नऊवार घालून ठसक्यात. जगातलं सगळ्यात मोठं मराठी रेस्टॉरंट चालवते आहे, तेही महाराष्ट्राच्या बाहेर १०० सीटर्स आणि अशा पाच शाखा आहेत.’’ असं जगातील सर्वात मोठी महाराष्ट्रीयन रेस्टॉरंटची चेन असलेल्या पूर्णब्रम्हच्या मालकीण जयंती कठाळे यांनी म्हटलं आहे. याशिवाय, जयंती कठाळे यांनी नितीन गडकरी यांच्यासाठी एक संदेशही दिला आहे, ज्याद्वारे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नितीन गडकरींच्या भाषणातून प्रेरणा घेत महिलांच्या नेतृत्वात सर्वात मोठ्या महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट चेनची निर्मिती करणाऱ्या जयंती कठाळेंचे भावनिक पत्र, म्हणाल्या…
आदरणीय, नितीन गडकरी सर,
‘’मी जयंती कठाळे पूर्णब्रम्हची मालक, तुमच्या प्रेरणादायी भाषणाबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार मानू इच्छिते. ज्यामुळे आम्हाला व्यावसायिक जगात महिला उद्योजक म्हणून मजबूत उभे राहण्याचे बळ मिळाले.
तुमच्या अतूट पाठिंब्याने आणि प्रोत्साहनामुळे आम्हाला सर्वात मोठी महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट चेन तयार करण्यात मदत झाली आहे, जी महिलांच्या नेतृत्वाखाली चालवली जाते. तुमची दूरदृष्टी आणि नेतृत्व अधिक समावेशक आणि न्याय्य समाजाच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. जिथे महिला उद्योजकांची भरभराट होऊ शकते आणि त्या देशाच्या विकासात योगदान देऊ शकतात. तुमच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वासाठी आम्ही तुम्हाला सलाम करतो.
तुम्ही देश आणि इथल्या नागरिकांसाठी करत असलेल्या सर्व गोष्टींचे आम्ही कौतुक करतो आणि तुमच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचा आम्हाला सन्मान वाटतो. तुमचे समर्पण आणि कठोर परिश्रम आम्हाला अधिक कठोर परिश्रम करण्यास आणि अधिक उंची गाठण्यासाठी प्रेरणा देतात.
पुन्हा एकदा, तुमच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. आम्ही भविष्यात तुमच्या सतत पाठिंब्याची आणि नेतृत्वाची अपेक्षा करतो.’’ अशा शब्दांमध्ये जयंती कठाळे यांनी भावना व्यक्त केली आहे.
‘’आपली सगळ्यांची मानसिकता नोकरीची आहे. मराठी माणसांमध्ये आपल्या घरातील मुलाला बेटा धोका घेऊ नको, आपली नोकरी कर, महिन्याला पैसे जमा कर, विमा काढ आणि हप्त्यांवर घर घे, हप्त्यांवर गाडी घे आणि सुखी संसार कर. हेच आपण आपल्या मुलांना शिकवतो, हे बंद करा. नोकरी मागणारे नाही नोकरी देणारा मराठी माणूस झाला पाहिजे.’’ असं नितीन गडकरींनी भाषणातून सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App