राज्यातील खाणपट्टे सुरु करावेत अशी सूचना केंद्रीय खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
Chief Minister Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यातील प्रमुख खाणपट्टे सुरू होऊन राज्याला महसूल प्राप्त होणे यासाठी बैठक संपन्न झाली.Chief Minister Fadnavis
केंद्र शासनाच्या धर्तीवर खनिकर्म विभागाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. राज्यातील खाणपट्टे सुरु करावेत अशी सूचना केंद्रीय खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी यांनी केली आहे. राज्यातील खनिकर्म विभागासाठी लागणारे पर्यावरण, महसूल, भूसंपादन व वन विभागातील प्रलंबित कामे फास्ट ट्रॅकवर घेऊन राज्यात 14 खाणी सुरू करून महसूल वाढवण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भूवैज्ञानिक अहवालांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करणे, खाणपट्टे लिलाव प्रक्रियेमध्ये व इतर कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्र अभ्यासाचा अधिकाधिक वापर करणे, महसूल विभागाकडे उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनींची माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देणे, ज्या खाणी कार्यरत नाहीत अथवा कालबाह्य झालेल्या आहेत त्यांचे विश्लेषण करणे, राज्य खाण निर्देशांकाची आणि राज्य खनिज शोध ट्रस्ट (SMET) स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, राष्ट्रीय खाण विकास निधी (NCMM) मिळवण्यासाठी स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले जाईल.
वाढवण बंदराच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात वाळूची आवश्यकता असणार असून त्यासाठी केंद्र शासनाकडून ‘हेतू पत्र’ जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेश वाघ यांना यावेळी वितरित करण्यात आले. बैठकीस मंत्री शंभूराज देसाई आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App