महाराष्ट्रात “या” मतदारसंघांमध्ये “या” तारखेला लोकसभा निवडणुकीत मतदान; वाचा तपशीलवार यादी!!

Election in Maharashtra in 5 phases

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 च्या मतदानाचे टप्पे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले असून 7 टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे. यापैकी महाराष्ट्रातल्या 48 मतदारसंघांमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. सर्व 543 लोकसभा मतदारसंघाचा निकाल 4 जून 2024 रोजी लागणार आहे. Election in Maharashtra in 5 phases

महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यांत ही निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

महाराष्ट्रात 19, 26 एप्रिल तसंच 7, 13 आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे, तसेच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

महाराष्ट्रात 5 टप्प्यांत निवडणूक

पहिला टप्पा : 21 राज्यात, 102 जागा

महाराष्ट्र : रामटेक, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर. मतदान तारीख : 19 एप्रिल

दुसरा टप्पा : 13 राज्यात, 89 जागा

महाराष्ट्र – बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी. मतदान तारीख : 26 एप्रिल

तिसरा टप्पा : 12 राज्यात, 94 जागा

महाराष्ट्र : रायगड, बारामती, उस्मानबाद, लातूर, सोलापर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले. मतदान तारीख : 7 मे

चौथा टप्पा : 10 राज्यात, 96 जागा

महाराष्ट्र : नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड. मतदान तारीख : 13 मे 

पाचवा टप्पा : 8 राज्यात, 49 जागा

महाराष्ट्र : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, (मुंबईतल्या 6 जागा)

मतदान तारीख – 20 मे

मतमोजणी तारीख : 4 जून 2024

देशासह महाराष्ट्रात 2019 च्या तुलनेत वेगळी स्थिती

मागील म्हणजेच 2019 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी देशात राजकीय स्थिती पूर्णपणे वेगळी आहे. महायुती, महाआघाडी यांचं गणित वेगळं दिसत आहे. मागील निवडणुकीत जे पक्ष विरोधी गटात होते ते आता एनडीएत सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रात तर फारच वेगळं चित्र आहे. शिवसेनेत दोन गट पडले असून एकनाथ शिंदेंनी भाजपाशी हातमिळवणी केली आहे. तर राष्ट्रवादीमधून अजित पवार गट बाहेर पडला असून तोही भाजपासोबत आहेत. विशेष म्हणजे शिंदे आणि अजित पवार गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे निवडणुकीत मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

Election in Maharashtra in 5 phases

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात