शिवसेना एकनाथ शिदेंचीच; का दिला निवडणूक आयोगाने असा निकाल?? वाचा तपशीलवार!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. ७८ पानांच्या आदेशपत्रात निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद इत्यंभूत दिला आहे. त्यानंतर या निकाल पत्रात निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष त्यातील लोकशाही याविषयीचे आपले परखड निरीक्षण नोंदविले आहे. Election commission passed the strictures on Uddhav Thackeray faction of undemocratic party constitution

  • शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण निवडणूक आयोगाने आपल्या निकाल पत्रात नोंदविले आहे.
  • कोणतीही निवडणूक न घेता अलोकतांत्रिक पद्धतीने एका गटातील लोकांना पदाधिकारी नेमण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. अशी पक्ष रचना लोकशाही विषयी आत्मविश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरते, असे परखड निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदविले आहे.
  • त्यामुळे शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाने कायम ठेवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

२०१८ मध्ये शिवसेनेची सुधारित घटना भारत निवडणूक आयोगाला देण्यात आलेली नाही. निवडणूकआयोगाच्या आग्रहास्तव स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणलेल्या १९९९ च्या पक्ष घटनेतील लोकशाही नियमांचा परिचय करून देणारा कायदा दुरुस्त्यांमुळे रद्द करण्यात आला होता. त्यासोबत शिवसेनेनेच्या मूळ घटनेतील अलोकतांत्रिक निकष जे १९९९ मध्ये आयोगाने स्वीकारले नाहीत, ते गुप्तपणे पुन्हा पक्षात पुन्हा आणण्यात आले होते, असे ताशेरे शिवसेनेच्या ठाकरे गटावर आयोगाने ओढले आहेत.

शिवसेनेतील मुख्य पदापासून ते विविध पदाधिकारी नेमणुकीपर्यंत जे निकष निवडणूक आयोगाने सर्व पक्षांसाठी कायदेशीर दृष्ट्या लावले आहेत, तेच शिवसेनेने पाळले नसल्याचा ठपका निवडणूक आयोगाने ठाकरे गटावर ठेवल्याचे या निकाल पत्रातून दिसून येत आहे.

Election commission passed the strictures on Uddhav Thackeray faction of undemocratic party constitution

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात