G-20 परिषदेसाठीच्या राजपत्रावर ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ उल्लेखाबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना साने गुरुजींचाही उल्लेख केला आहे, जाणून घ्या काय म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  संविधानातून ‘इंडिया’ हा शब्द काढून टाकण्यासाठी मोदी सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात विधेयक मांडण्याचा विचार करत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की राष्ट्रपती भवनात 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G20 डिनरच्या निमंत्रण पत्रात ‘ The President of India’ ऐवजी ‘The President of BHARAT”  लिहिले आहे. यास विरोधी पक्षांकडून विरोध दर्शवला  जात आहे.  त्यामुळे सध्या देशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Eknath Shindes response to the mention of Bharat instead of India in the gazette for the G20 Council

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  म्हणाले, ”केंद्र सरकारने G-20 परिषदेसाठी जाहीर केलेल्या राजपत्रावर ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असा उल्लेख केला आहे. हा उल्लेख निश्चितच अभिमानास्पद आहे. देशाच्या राज्यघटनेमध्येच India that is ‘Bharat’ असा स्पष्ट उल्लेख असून राज्यघटनेने देखील हे नाव मान्य केले आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘भारतमाता की जय’ हीच घोषणा प्रत्येक देशवासियांच्या मुखातून ऐकू येत होती.

याचबरोबर ”साने गुरुजींनी देखील बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो… असेच आपल्या कवितेद्वारे देशाचे वर्णन केले. हजारो स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने स्वतंत्र झालेल्या देशाला ‘भारत’ या नावाने ओळखले जावे हे अभिमानास्पद आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घ्यायचे ठरवले असल्यास या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. भारतमाता की जय!” असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशवासियांना ‘इंडिया’ या शब्दाऐवजी देशाला ‘भारत’ म्हणावे असे आवाहन केले आहे. सरसंघचालकांना यासाठी पुरातनकालाचा दाखला दिला असून, भारत हे नाव प्राचीन काळापासून चालत आलेले आहे, ते पुढेही चालू ठेवावे, असे म्हटले आहे.

Eknath Shindes response to the mention of Bharat instead of India in the gazette for the G20 Council

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात