प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde एफबी म्हणजे फुकटचा बाबूराव, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टोला लगावला आहे. सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले, या प्रसंगी भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. तसेच मी पण एफबी म्हणजे ‘फेव्हरेट भाऊ’, असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.Eknath Shinde
एकनाथ शिंदे म्हणाले, खुर्च्या बदलल्या तरी दिल बदलले नाही. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आम्ही जे बोललो ते सर्व देणार आहोत. फक्त थोडी थोडी परिस्थिती सुधारू द्या. कर्जमाफी असो किंवा काहीह घोषणा, त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. तसेच आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही, असेही शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, त्यांनी फेसबुक लाइव्ह करून फेक नरेटीव्ह पसरवले. ते एफबी म्हणजे फुकटचा बाबुराव आहेत. मी सुद्धा एफबी म्हणजे फेवरेट भाऊ आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी हात बढाकर आसमाँ छू लेंगे हम. अपनी हार को जीत में बदल देंगे हम, असे म्हणत शहाजी बापू पाटील यांना मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्द दिला आहे. आमदार, नामदार असूदे किंवा नसू दे एकनाथ शिंदे ज्यांच्या पाठीशी उभा आहे, त्यांना चिंता करण्याचे काही कारण नाही, असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, अनेकदा काम करूनही यश मिळत नाही, त्यामुळे निराश व्हायचे नसते. एखादी मॅच हरली म्हणून विराट कोहिलीची बॅट थंड पडत नाही. पुढच्या मॅचमध्ये दुप्पट वेगाने गोलंदाजांवर तुटून पडते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते, त्यामुळे शहाजीबापू चिंता करू नका. शहाजी बापूंसाठी मी एकच शब्द उच्चारतो, टायगर अभी जिंदा है. शहाजी बापूंना मी वाऱ्यावर सोडणार नाही. ‘हात बढाकर आसमाँ छू लेंगे हम. अपनी हार को जीत में बदल देंगे हम’, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजी बापू पाटील यांना आणि त्यांच्या समर्थकांना शब्द दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App