Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांची भेट आणि आमदारांची नाराजी दूर

Eknath Shinde

 

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Eknath Shinde आमचे सगळे जीवभावाचे कार्यकर्ते आहेत, माणूस आहे. प्रत्येकाची अपेक्षा असते काही वेळा भावना व्यक्त होतात. पण मंत्री पदापेक्षा आमचं नातं जिव्हाळ्याचे आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे नाराज आमदारांची नाराजी दूर झाली.Eknath Shinde

राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने आमदार प्रकाश सुर्वे, विजय शिवतारे नाराज झाले. आहेत. या नाराज आमदारांची आज शिंदे यांनी भेट घेतली. त्यानंतर बोलताना शिंदे म्हणाले, शिवसेनेचे आमदार, कार्यकर्ते काल माझ्या सोबत होते, आजही माझ्या सोबत आहेत आणि उद्या ही राहतील. शिवसेना हा एक परिवार आहे. परिवारात भांडण होतात. काही लोक राजकीय अर्थ काढू लागले आहेत.



पण मंत्रीपदा पेक्षा आमच जिव्हाळ्याच नातं आहे ते महत्वाचे आहे. मलाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदापेक्षा लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे पद महत्वाचं आहे. पदे येतात जातात, ज्या आमदारांची क्षमता आहे त्यांना मंत्री बनवले. बाकीचे पण आहे, त्यांनी वाईट मानून घ्यायची गरज नाही. ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना पुढच्या टप्प्यात संधी मिळेल आता ते पक्षातील कामे करतील. एक दोन दिवस माणसाच्या मनात नाराजी असते , कुटुंबापासून कोणी दूर होत नाही. लोकांच बहुमत मिळाल्याने आता आमची जवाबदारी आहे. मलाकाय मिळालं त्या पेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळालं हे महत्त्वाच आहे अडीच वर्षात प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला.

कल्याण घटनेबाबत शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन केलेलं आहे. त्यावर कारवाई देखील केलेली आहे. मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला. या महाराष्ट्रात मराठी माणसाचा अपमान कोणालाही करता येणार नाही संबंधित घटना गांभीर्याने घेतलेली आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे.

Eknath Shinde’s meeting and MLAs happy

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात