Eknath Shinde : नियम, अटी आणि शर्ती बाजुला ठेऊन शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय, एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde

 

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Eknath Shinde : संकटात मदत करणे ही सरकारची जबाबदारी व कर्तव्य आहे. नुकसानीची संपूर्ण माहिती आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही एकत्र बसून चर्चा करू आणि शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेऊ. नियम, अटी आणि शर्ती बाजुला ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह आम्ही सर्व मंत्र्यांनी पूरग्रस्त भागात भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांवर आलेले संकट खूप मोठे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी बोलताना त्यांच्या वेदना जाणवर होत्या. गेल्या अनेक वर्षांमध्ये अशाप्रकारची पूरपरिस्थिती आणि असा पाऊस कधीही पडला नाही. हे संकट मोठे आहे आणि या संकटात सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. प्रत्येक आपत्तीवेळी सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिलेले आहे. त्यामुळे सर्व मुद्द्यांवर आजच्या कॅबिनेट बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती शिंदे यांनी दिली.



एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत देताना सरकार हात आखडता घेणार नाही. सध्या पंचनाम्यांची माहिती येत आहे. जवळपास साठ लाख हेक्टरवरील जमिनी आणि पिकांचे नुकसान झाल्याचा आकडा समोर आला असून पुढील दोन तीन दिवसांमध्ये संपूर्ण नुकसानीचे प्रमाण आणि आकडे येतील. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करताना अटी, शर्थी आणि नियम बाजुला ठेवून त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे, अशी आमच्या सर्वांची भावना आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शेतकऱ्यांच्या मदतीबाबत निवेदन दिले. त्यासोबतच आमच्या तिघांच्या सहीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

Eknath Shinde’s information: Concrete decisions for farmers, leaving aside rules, terms and conditions

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात