विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय घेण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी म्हणे फार “मोठ्ठा गौप्यस्फोट” केला आहे. एकनाथ शिंदे मातोश्री वर येऊन भाजपबरोबर चला नाहीतर मला जेलमध्ये टाकतील असे सांगून रडले होते, असा दावा आदित्य ठाकरेंनी आपल्या फरड्या इंग्लिश मध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे आणि त्यावरून मराठी माध्यमांनी आदित्य ठाकरेंनी प्रचंड मोठा “गौप्यस्फोट” केल्याच्या बातम्या दिल्या आहेत.Eknath shinde was weeping in matoshree, in fear of jail term claimed aditya Thackeray, but his claim goes invain
* आदित्यच्या पॉलिटिकल मॅच्युरिटीवर शंका*
आता हा गौप्यातला स्फोट आहे की स्फोटात वेगळेच काही गौप्य दडले आहे??, हा प्रश्न आहे. पण त्या पलिकडे ज्या एकनाथ शिंदेंना भाजपचे नेते म्हणे, जेलमध्ये घालणार होते, त्या शिंदेंनाच फक्त 40 आमदार फोडले म्हणून मुख्यमंत्री करायला मोदींचे भाजपवाले राजकीय मूर्ख आहेत, असे आदित्य समजत आहेत का?? हा जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे!! किंबहुना आदित्य ठाकरे यांच्या पॉलिटिकल मॅच्युरिटीवर ठळक प्रश्नचिन्ह लावणारा हा प्रश्न आहे!!
मोठे नेते प्रतिक्रियाही टाळताहेत
आदित्य ठाकरेंची सुद्धा कमाल आहे. उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून ते महाराष्ट्राचे मंत्री झाले. त्याआधी बाळासाहेबांनी तलवार हाती दिली म्हणून युवा सेनेचे प्रमुख झाले. शिवसैनिकांनी ते “ठाकरे” आहेत म्हणूनच त्यांना स्वीकारले. पण म्हणून आपल्या वयापेक्षा मूळात ज्यांची राजकीय कारकीर्द दुप्पट आहे, त्यांच्याविषयी ते थेट मातोश्रीवर येऊन रडल्याची भाषा वापरायची?? आदित्य यांनी एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडल्याची जी भाषा आदित्य यांनी वापरली आहे ना, त्यातूनच आदित्य यांच्या राजकीय समजा विषयीची शंका तयार होते. गेल्या दोन-तीन दिवसांतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या कुठल्याही वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे आणि ती टाळताना आदित्य यांच्या वयाचा आणि राजकीय अनुभवाचा सूचकपणे उल्लेख केला आहे. हे तरी निदान आदित्य यांनी लक्षात घ्यायला हवे होते. पण आदित्य यांनी ते लक्षात घेतलेले दिसत नाही. त्यामुळेच आदित्य यांच्या “मूलभूत राजकीय समज” या विषयी दाट शंका तयार झाली आहे.
भाजपची कॅल्क्युलेशन्स आहेत की नाही?
कारण आदित्य ठाकरे यांनी केलेला दावा खरा मानायचा म्हटला, तर ज्या एकनाथ शिंदेंना भाजपवाले जेलमध्ये घालायला निघाले होते, त्यांना शिवसेना फोडल्याबद्दल एखादे मंत्री पद किंवा उपमुख्यमंत्री पद देऊन त्यांचे समाधान करता आले असते. पण तरीही भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. यामागे भाजपची स्वतःची काही राजकीय कॅल्क्युलेशन्स असतील की नाही?? की फक्त राजकीय कॅल्क्युलेशन्स शरद पवारांनाच आणि आपले पिताश्री उद्धव ठाकरे यांनाच करता येतात, असे आदित्यंचे म्हणणे आहे?? तसे म्हणणे असेल तरी हरकत नाही. पण याचा अर्थ मोदींच्या भाजपच्या नेत्यांना ती कॅल्क्युलेशन्स करता येत नसतील असे समजण्याचे कारण नाही. पण तरीही आदित्य तसे समजत असतील तर, तसे समजण्याचे आदित्य यांचे मूळ लॉजिक काय??, हाही प्रश्नच आहे.
माध्यमांच्या अकलेचे दिवाळी
कारण आदित्य यांच्या एका किरकोळ मुलाखतीवरून त्यांनी केलेल्या दाव्याचा गौप्यस्फोट अशी बातमीदारी करणे हा मराठी माध्यमांच्या “पवार बुद्धीचा” नमुना म्हणून समजू शकते. पण ज्या एकनाथ शिंदेंना जेलमध्ये टाकायला भाजपवाले निघाले होते, असे आदित्य ठाकरे यांचे म्हणणे आहे, ते भाजपवाले थेट एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करतील??, असे समजणे हा आदित्य ठाकरे यांच्या वयानुसार आलेल्या राजकीय खुळचटपणा आहे, असेच मानावे लागेल!!… पण त्या पलीकडे जाऊन मराठी माध्यमांनी आदित्य ठाकरे यांच्या दाव्याच्या बातम्या “गौप्यस्फोट” म्हणून देणे हे माध्यमांच्या राजकीय अकलेचे दिवाळे निघाल्याचे लक्षण मानावे लागेल!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App