प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यावरून मोठा गदारोळ उडला असला आणि बाकीच्या नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या असल्या तरी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकाच शब्दात आदित्य ठाकरे यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तो शब्द म्हणजे “बालिश”!! Eknath shinde was weeping, claimed aditya Thackeray, but shinde and narayan rane targets aditya with one word “childish”
आदित्य ठाकरे बालिश असल्यामुळे अशी काहीही वक्तव्ये करतात. त्याला मी उत्तर देत नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या दाव्याची वासलात लावली, तर आदित्य ठाकरे बालिश असल्यास आहेत. त्यांचे कुठलेही वक्तव्य तुम्ही गांभीर्याने घेऊन आम्हाला प्रश्न का विचारता??, असा उलटा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांत आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या बंडावर काहीबाही बोलत होते. परंतु स्वतः एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदित्य यांच्याकडे राजकीय दृष्ट्या दुर्लक्ष करत होते. आदित्य यांच्या कोणत्याही वक्तव्यावर मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री प्रतिक्रियाही व्यक्त करत नव्हते.
पण इंडिया टुडेच्या कन्क्लेव्हमध्ये आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजप बरोबर चालण्याची विनंती त्यांनी केली होती. कारण त्यांना जेलमध्ये जाण्याची भीती होती, असा दावा केला होता. त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात गदारोळ उठला. पण स्वतः एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मात्र आदित्य ठाकरे यांना “बालिश” या एकाच शब्दात संबोधत तो विषय त्यांच्या दृष्टीने संपवला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App