विशेष प्रतिनिधी
सातारा : एकीकडे महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धबडगा सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरेगावातल्या उत्तरेश्वराच्या यात्रेला विसरले नाहीत. त्यांनी प्रचारातून थोडा अवधी बाजूला काढून दरे गावाला भेट दिली आणि उत्तरेश्वराच्या यात्रेत महापूजा केली.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील आमच्या दरे या मूळगावी असलेल्या श्री क्षेत्र उत्तेश्वराच्या यात्रेला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी श्री उत्तेश्वराचे मनोभावे पूजन करून दर्शन घेतले.
यानंतर एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सगळ्यांशी संवाद साधला. कोयनेच्या पात्राजवळ वसलेले दरेगाव आता विकासाची नवी कास धरणार आहे. कोयना नदीवर तयार होत असलेला पूल पूर्ण होत आला आहे. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र एकमेकांच्या अधिक जवळ येणार असून दळणवळण अधिक सोपे आणि सुलभ होणार असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितले.
येथील नदी पात्रात वॉटर स्पोर्ट्स सुरू झाल्याने स्थानिकांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्प आकाराला येत असून त्यामुळे भविष्यात मुंबई पुण्याची वाट न धरता स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. उत्तेश्वर मंदिर परिसर विकासाचे कामही प्रगतीपथावर असून त्यामुळे इथे येणे जाणे सोपे होणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी सौ. वृषाली शिंदे, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App