“माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही तुमची घोषणा; पण “माझा महाराष्ट्र गतिमान महाराष्ट्र” हे आमचे ब्रीद; मुख्यमंत्र्यांचा ठाकरे – पवारांना टोला

प्रतिनिधी

मुंबई : आधी फक्त माझे कुटुंब, माझी जबाबदारी एवढीच घोषणा होती. मात्र, आमची घोषणा एवढी मर्यादित आणि संकुचित नाही. आमची घोषणा आहे, माझा महाराष्ट्र आणि गतिमान महाराष्ट्र हे आमचे ब्रीद वाक्य आहे. आम्ही छोटा विचार करत नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवारांना टोला लगावला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधकांना उत्तर देत होते. Eknath shinde targets Thackeray Pawar government over its slogan my family my responsibility

एकनाथ शिंदे म्हणाले, ते जाहिरातीच्या खर्चाचे जाऊ द्या, आधी फक्त माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही एवढीच घोषणा होती. मात्र, आमचं ब्रीद वेगळं आहे. माझा महाराष्ट्र आणि गतिमान महाराष्ट्र हे आमचे ब्रीद आहे. आम्ही मर्यादित आणि संकुचित विचार करत नाही, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे – पवारांना टोला लगावला आहे.

कायदा सुव्यवस्थेवरून राज्यात काय परिस्थिती होती तुम्हाला माहिती आहे. अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गृहविभाग कसे काम करत होता उद्धव ठाकरेंच्या काळात? हे सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळीही आपण पाहिले की काम कसे चालत होते.

साधू हत्याकांड झाले, लष्कराच्या माजी अधिका-याला मारहाण झाली, जळित कांड झालं, संभाजीनगरची दुर्दैवी घटना घडली, मुंबईतल्या साकीनाका भागात दुर्दैवी घटना घडली, शर्जील उस्मान, मनसुख हिरेन कितीतरी प्रकरणे राज्यात उद्धव ठाकरेंच्या काळात घडली. पण त्यावेळी तुमच्या सरकारने काय केले?, असा सवाल त्यांनी अजितदादांना विचारला.

आम्ही सुडभावनेने वागत नाहीत

आता गुन्ह्यांची नोंद घेतली जात आहे. गुन्ह्यांचा तपास केला जात आहे. गुन्हेगारांना आळा घालण्याचे काम सरकार करत आहे. हुनमान चालिसावरुन रवी राणा आणि त्यांच्या पत्नीला तुरुंगात धाडले. कंगनाचे घर तोडले. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचे षड्यंत्र रचले गेले. आता आम्ही असे काहीही वागत नाहीत, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले.

Eknath shinde targets Thackeray Pawar government over its slogan my family my responsibility

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात