प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना-भाजप युतीच्या शिंदे फडणवीस सरकारने विधानसभेत विश्वास दर्शक ठराव संमत करून घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार प्रदर्शनाच्या भाषणात महाविकास आघाडीवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख आपल्याला महाविकास आघाडीत असताना करता येत नसल्याची खंत बोलून दाखवली. Eknath shinde targets Congress and MVA over savarkar issue
– आम्हाला गप्प बसावे लागले
आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन चालत आहोत. पण शिवसेनेने हिंदुत्वाला विरोध करणा-या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सूत जमवले. त्यामुळे ते आम्हाला सहन होत नव्हते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी बंड,उठाव करावा, ही बाळासाहेबांची शिकवण आहे. पण गेल्या अडीच वर्षांत आम्हाला खूप वाईट अनुभव आला. काँग्रेस सोबत असल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत बोलता येत नव्हतं. काँग्रेसने आपल्या शिदोरी या मुखपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केली, तरी आम्हाला गप्प बसावं लागलं, अशी खंत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष
बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार म्हणून ही भूमिका घेतली आहे. आम्ही कालही शिवसैनिक होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार. सत्तेसाठी आम्ही हिंदुत्वाशी तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. बहुमत चाचणीमध्ये एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या युती सरकारचा विजय झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यावेळी सभागृहात शिवसेना-भाजप युतीच्या आमदारांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रचंड जयघोष केला. विधानभवनाच्या इतिहासात ही घटना पहिल्यांदाच घडली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App