नगरपालिकांच्या विजयानंतर एकनाथ शिंदे लागले पुढच्या कामाला; महाविकास आघाडीचे नेते पत्रकार परिषदांमध्ये मग्न!!

Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

ठाणे : नगरपालिका मधल्या विजयानंतर न थांबता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लागले पुढच्या कामाला. त्यांनी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने अनेक मेळावे घ्यायला सुरुवात केली असून ठाणे शहरामध्ये उत्तर भारतीय समाजाच्या ओबीसी समुदायाची प्रातिनिधिक बैठक घेतली. त्यांच्या विविध समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांचे मेळावे घेतले पण त्याचवेळी महाविकास आघाडीतले वेगवेगळे नेते पत्रकार परिषदा घेण्यात किंवा पत्रकारांना बाईट देण्यात मग्न राहिले.Eknath Shinde started his next task; Mahavikas Aghadi leaders are busy in press conferences!!

उत्तर किंवा दक्षिण नव्हे तर, आपण सारे भारतीय म्हणून एकत्र आलो आहोत असे याप्रसंगी नमूद केले. उत्तर भारतीय समाज हा या राज्यात गेली अनेक वर्षे कार्यरत असून मेहनतीच्या जोरावर कष्टाची कामे करत असल्याचे यावेळी सांगितले. मुंबई शहरातील बहुतांश सेवा या उत्तर भारतीय लोकांच्या हातात आहेत, त्यामुळे या शहराच्या विकासात आपलेही योगदान महत्त्वाचे आहे असे मत याप्रसंगी व्यक्त केले. यापूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उत्तर भारतीय समाज हा महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभा होता, त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीतही महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे असे आवाहन त्यांना केले.



मुंबईत उत्तर भारतीय समाज आता चांगलाच रुळला आहे. इथे हा समाज सुरक्षितपणे आपली रोजी रोटी कमवत आहे. शहरात गणपती, नवरात्र त्याचप्रमाणे छठ पूजाही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. लाडकी बहिण योजनेचे लाभ आम्ही सर्व समाजातील महिला भगिनींना दिले असून उत्तर भारतीय महिलांना देखील त्याचा लाभ मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन बांधायला जागा दिली आहे, तर मीरा भाईंदर मध्ये आम्ही उत्तर भारतीय भवन उभारत असल्याचे याप्रसंगी अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले सुराज्य आपल्याला निर्माण करायचे असून, मुंबई शहराचा सुंदर आणि सुनियोजित विकास करायचा आहे, त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ गरजेची आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकला जावा यासाठी आपल्या सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले.

याप्रसंगी माजी खासदार आणि शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम आणि उत्तर भारतीय समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मीरा-भाईंदर आणि ऐरोली मध्ये सुद्धा शिवसैनिकांचे मोठे मेळावे घेतले.

– पत्रकारांना बाईट देण्यात मग्न

मात्र याच दरम्यान महाविकास आघाडीतले वेगवेगळे नेते फक्त पत्रकारांना बाईट देण्यात किंवा पत्रकार परिषदा घेण्यात मग्न राहिले. यात संजय राऊत, सुप्रिया सुळे, रोहित पवार आघाडीवर होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अजून एकही मेळाव्याला संबोधित केल्याची बातमी आली नाही.

Eknath Shinde started his next task; Mahavikas Aghadi leaders are busy in press conferences!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात