विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? त्यांनी शेतकऱ्यांना काय दिले? शेतकऱ्यांचे किती अश्रू पुसले? शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले? हे सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे आधी उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.Eknath Shinde
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये कर्जाची घोषणा केली होती. त्यांना पैसे देण्याचा निर्णय घेतला मात्र, दिले नाही. यातील 20 लाख शेतकऱ्यांना आम्ही पैसे दिले. त्यामुळे ठाकरे यांनी स्वतः आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.Eknath Shinde
राज्यातील महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूचे आहे. मी मुख्यमंत्री असताना आम्ही शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली होती. तसीच योजना आमच्या महायुतीच्या काळात आम्ही कायमस्वरूपी तयार केली. यात वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला. ती योजना आजही सुरू आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतले आहेत, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.Eknath Shinde
शेतकऱ्यांवर आलेले संकट फार मोठे
एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्व महायुतीतील नेते शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री, मी स्वतः आणि अजित पवार आमच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट फार मोठे आहे. ते छोटे संकट नाही. ही आपत्ती मोठी आहे.
आमचे सरकार अतिशय गंभीर
गेल्या अनेक वर्षात अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नव्हता. यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेच आहे. त्याच बरोबर जमीन खरडून गेली आहे, जमीन वाहून गेली आहे, जनावरांचे नुकसान झाले आहे, घरांची पडझड झाली आहे. या सर्वांचा विचार करून आम्ही मंत्रिमंडळात देखील चर्चा केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे नियम, अटी, शर्ती सर्व बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय पडेल? त्याच्या डोळ्यातले अश्रू कशा पद्धतीने पुसले जातील, यावर आमचे सरकार अतिशय गंभीर असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. एक दोन दिवसात यावर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
दिलासा देण्याची प्रक्रिया या आधीच सुरू
आम्ही देणारे आहोत, नेहमी देत आलेलो आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा महायुती सरकार लवकरच देईल, असा दावा देखील शिंदे यांनी केला. शेतकऱ्यांना मदत करताना आम्ही आखडता हात घेणार नाही. शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचा चेक देणे सुरू केलेले आहे. धान्य देण्याचे काम देखील सुरू आहे. तात्काळ दिलासा देण्याची प्रक्रिया या आधीच सुरू झाली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. अटी, शर्ती बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे हे सरकार आहे. आतापर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिलेलो आहोत. त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
लाडकी बहीण योजनेला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता
लाडकी बहीण योजनेला तर उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता. त्या विरोधामध्ये त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे त्यांना या योजनेवर बोलण्याचा अधिकार नाही. लाडक्या बहिण योजनेत खोडा घालणाऱ्या सर्वांनाच चांगले जोडे लाडक्या बहिणीने दाखवले आहेत. त्यामुळे लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. महायुती सरकारने ही योजना सुरू केली आहे. ही योजना कधीही बंद होणार नसल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. यावर कितीही अफवा आणि बदनाम करण्याचे कारस्थान केले. तरी लाडक्या बहिणी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्यांना विरोध करणारे हे सावत्र आणि दृष्ट भाऊ आहेत, हे त्यांनी ओळखले असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
परिवहन महामंडळाने केलेली 10 टक्के बस भाडे दरवाढ रद्द
राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली 10 टक्के बस भाडे दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे जाहीर केले. उपमुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी बोलताना सांगितले की, एस टी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे महामंडळाला 30 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र यंदा राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेवून अपवाद म्हणून महामंडळाने जाहीर केलेली 10 टक्के भाडेवाढ रद्द करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App