विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “कोविड काळात मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांनी आणि मुंबई लुटणाऱ्यांनी अमित शहा यांच्यावर बोलणे ही मोठी शोकांतिका आहे,” अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. तसेच स्वत:चे पायपुसणे करून घेणाऱ्यांना दुसऱ्यावर टीका करायचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले.Eknath Shinde
उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका आणि कोविड काळातील कथित भ्रष्टाचाराचा पाढाच वाचला. शिंदे म्हणाले, “ज्यांनी अनेक वर्ष मुंबईची तिजोरी लुटली, मिठी नदीतील गाळ आणि रस्त्यातील डांबर खाल्ले, एवढेच नाही तर कोविडसारख्या महामारीत रुग्णांच्या तोंडची खिचडी आणि डेडबॉडी बॅगमध्येही पैसे खाल्ले, अशा लोकांनी दुसऱ्यांवर टीका करू नये. खोटी कोविड सेंटर्स उभी करून मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांचा बॅलन्स गेला असून ते आता काहीही बोलू लागले आहेत.”Eknath Shinde
‘घटनाबाह्य’च्या आरोपावर स्पष्टीकरण
सध्याच्या सरकारला आणि उपमुख्यमंत्रिपदाला ‘घटनाबाह्य’ म्हणणाऱ्या ठाकरेंवरही शिंदेंनी निशाणा साधला. “मी मुख्यमंत्री असतानाही हे पद घटनाबाह्य असल्याचे ते म्हणायचे, आता मी उपमुख्यमंत्री आहे तर तेही त्यांना घटनाबाह्य वाटते. मुळात त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि घटनाच मान्य नाही, म्हणून ते असा टाहो फोडत असतात. उद्धव ठाकरेंच्या काळातही अजित पवार उपमुख्यमंत्री होते, मग तेव्हा ते चालले कसे? हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील याचिका आणि इतिहास तपासून त्यांनी बोलावे,” असे खडेबोल एकनाथ शिंदेंनी सुनावले.
जनतेने जागा दाखवली
विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा दाखला देत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. “ज्यांचे घर काचेचे असते, त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत. एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होतो, हे त्यांना पचनी पडलेले नाही, त्यातूनच त्यांची पोटदुखी सुरू आहे. मात्र, विधानसभेत दोन नंबरने त्यांना शेवटच्या नंबरला बसवून जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे,” असा टोला शिंदेंनी लगावला.
दुटप्पी भूमिकेवर टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांघरुण मंत्री असे नवे खाते काढून, त्याचा चार्ज स्वत:कडे ठेवावा, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. या टीकेलाही एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. “फडणवीस इतकेच वाईट आहेत, तर मग बुके घेऊन त्यांची वारंवार भेट का घेता? एका बाजूला गोडवे गायचे आणि दुसरीकडे टीका करायची ही दुटप्पी भूमिका योग्य नाही. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी ज्यांनी स्वतःचे पायपुसणे करून घेतले, त्यांना मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करायचा काय अधिकार आहे?”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App