विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला बाप दाखवण्याचे काम केल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी तिरंगा रॅलीत बोलताना व्यक्त केली. पाकविरोधातील कारवाईनंतर त्याचे राजकारण करणाऱ्यांना जनाची नव्हे तर मनाची लाज वाटली पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.Eknath Shinde
एकनाथ शिंदे म्हणाले, आजची तिरंगा रॅली सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी तथा त्यांच्या वीरतेचा व शौर्याचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे मी तिन्ही सैन्य दलांचे अभिनंदन करतो. पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर देऊन धडा शिकवण्याचे काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही मी कौतुक करतो. पहलगाममध्ये पाक धार्जिन्या अतिरेक्यांनी निरापराध लोकांचे बळी घेतले. या हल्ल्यामुळे देशवासियांच्या मनात प्रचंड मोठा संताप निर्माण झाला. या घटनेचा बदला घेण्याची भावना निर्माण झाली. पंतप्रधान मोदी यांनी देशाची ही भावना ओळखून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्याचा बदला घेतला घेतला. लष्करानेही या प्रकरणी ‘ईंट का जबाब पत्थरसे’ दिला.
ते एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी पाकच्या गोळीचा बदला मिसाईलने घेतला. तिकडून गोळी आली तर इकडून तोफगोळा मारला जाईल असे पाकला ठणकावून सांगितले. आत्ता भारत पाकचे नामोनिशाण मिटवून टाकेल. आत्तापर्यंत पाकविरोधात अशा प्रकारची कारवाई करण्याची हिंमत कोणत्याही पंतप्रधानाने दाखवली नाही.
पाकला बाप दाखवून दिला
ते पुढे म्हणाले, 26/11चा हल्ला झाला, सैनिकांचे शीर कापून पाकिस्तानात नेण्याचे कृत्य झाले, बॉम्बस्फोट झाले. पण तेव्हा देखील राज्यकर्त्यांनी हिंमत दाखवली नाही. पण ही हिंमत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवली. त्यामुळे त्यांचा आपल्याला अभिमान आहे. बाप बाप होता है. पाकिस्तानला बाप काय असतो हे दाखवण्याचे काम आपल्या लष्कराने केले. लष्कराने पाकची हवाई तळे व अतिरेक्यांचे 9 अड्डेही उद्ध्वस्त केले. खरे म्हणजे आपल्या लष्कराने संयमी भूमिका घेतली. मोदींनी संयमी भूमिका घेतली. आपण त्यांचे केवळ अतिरेक्यांचे अड्डे नष्ट केले. या प्रकरणी पाकच्या कोणत्याही नागरिकाला त्रास दिला नाही. पण पाकने अगदी उलट काम केले. त्यांनी शस्त्रसंधी झाल्यानंतरही गोळीबार केला. त्यामुळे कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे असल्याचे स्पष्ट झाले. पण मोदींनी हे शेपूटच छाटण्याची हिंमत दाखवली.
विरोधकांना जनाची नव्हे तर मनाची लाज वाटली पाहिजे
हा भारत नवा आहे. घुसून मारणारा भारत आहे. भारत एवढ्या आतमध्ये येऊन मारेन असे पाकला माहिती नव्हते. त्यामुळे तो घाबरला आहे. भारताने यापुढे पाकची कोणतीही कुरापत युद्ध समजली जाईल, तथापी आत्ता पाकशी केवळ पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा होईल असे ठणकावून सांगितले आहे. या प्रकरणी सरकार व सैन्याच्या मागे ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. पण काही लोक त्याचेही राजकारण करत आहेत. त्यांना जनाची नव्हे तर मनाची लाज वाटली पाहिजे, असेही एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App