विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांना एका व्यक्तीने धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. एका 24 वर्षीय तरुणाने एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत त्याने सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टद्वारे त्याने एकनाथ शिंदे यांना धमकी दिली. याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तरुणावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. हितेश प्रभाकर धेंडे असे या तरुणाचे नाव आहे. Eknath Shinde
एकनाथ शिंदेंना धमकी देणारा हितेश धेंडे हा ठाण्यातील श्रीनगर वारली वाडा या परिसरात राहतो. त्याने आपल्या पोस्टमध्ये रात्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर गोळीबार करणार, असे म्हटले. तसेच शिवीगाळही केली. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या हितेश धेंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने श्रीनगर पोलिस ठाण्याबाहेर जमा झाले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्या तरुणाचा शोध सुरू आहे.
याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी म्हणाले की, श्रीनगर परिसरातील एक इसम आहे त्याचे नाव हितेश धेंडे असं आहे. त्याने साडेसहा वाजण्याच्या सुमारास इन्स्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ केला. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केली, तसेच त्यांच्या घरावर गोळीबार करण्याची धमकी दिली. आमच्याकडे ही पोस्ट आल्यानंतर आम्ही तातडीने पोलिस ठाणे गाठत तरुणावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. पोलिसांनी हा गुन्हा नोंद करून घेतला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App