राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा कर्नाटकात फक्त सीमावर्ती भागात प्रचार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 3 दिवसांचा विस्तृत कर्नाटक दौरा!!

प्रतिनिधी

बेळगावी : राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे निवडक नेते कर्नाटकात फक्त सीमावर्ती भागात निवडणूक प्रचार करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मात्र कर्नाटकचा विस्तृत दौरा जाहीर झाला आहे. एकनाथ शिंदे 3 दिवस कर्नाटकात असतील आणि ते बंगलोरसह मध्य आणि दक्षिण कर्नाटकातल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करतील. Eknath shinde on 3 days karnataka election tour, to campaign for BJP with amit shah

वास्तविक एकनाथ शिंदे गटाने एकही उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवलेला नाही, तरी देखील शिंदे यांचा 3 दिवसांचा कर्नाटक दौरा बरीच मोठी राजकीय कमेंट करत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बंगलोर मध्ये एकनाथ शिंदे ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर रोडशो मध्ये सहभागी होणार आहेत.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी फक्त बेळगाव परिसरात प्रचार केला. राष्ट्रवादीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 46 उमेदवार उतरवण्याची घोषणा करून प्रत्यक्षात फक्त 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी कर्नाटकात काही सभा घेतल्या. पण त्यापैकी आमदार प्रणिती शिंदे यांची सभा महाराष्ट्र एकीकरण समितीने उधळली. अशोक चव्हाण यांनी कर्नाटक मधले एका सभेत बजरंग दलावर बंदीचे समर्थन केले, संजय राऊत हे देखील बेळगाव परिसरात प्रचार करून आले. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा तीन दिवसांचा विस्तृत कर्नाटक दौरा होत आहे.

महाराष्ट्रात अस्थिर राजकीय वातावरण असल्याच्या बातम्या मराठी माध्यम देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या घडामोडींवर त्यांचा फोकस आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा हवाला देत एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र झाले, तर शिंदे – फडणवीस सरकार अडचणीत येईल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी भाजप अजित पवारांचा पर्याय शोधत असल्याच्या बातम्याही मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.

पण या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे भाजपला “जड” किंवा नकोसे झालेले नाहीत. उलट ते कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत मध्य आणि दक्षिण कर्नाटक मध्ये भाजपच्या प्रचारात सहभागी होत आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर रोडशो मध्ये देखील सहभागी होत आहेत. यातून भाजप महाराष्ट्रासह कर्नाटक आणि संपूर्ण देशात एक विशिष्ट राजकीय मेसेज देत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 3 दिवसीय कर्नाटक दौरा पुढीलप्रमाणे

शनिवार दिनांक :- 6 मे 2023

रात्री 8.00 वाजता
मुंबई विमानतळावरून कर्नाटक दौऱ्यासाठी प्रस्थान

रात्री 9.30 वाजता
बंगळुरू येथे आगमन आणि राखीव

रविवार दिनांक :- 07 मे 2023

सकाळी 6.30 ते 8.00 वाजता
बंगळुरू येथील कबोन पार्क येथील मतदारांसोबत चालून त्यांच्याशी संवाद साधणार

सकाळी 9.30 ते 10.30 वाजता
डोड्डागणपती मंदिर, बसवनागुडी, बंगळुरू येथे श्रीगणेशाच्या मंदिराला भेट देऊन पूजा व दर्शन घेणार

संध्याकाळी 4.00 ते 7.00 वाजता
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत रोड शो मध्ये सहभागी होणार
( मार्ग :- चांदपुरा सर्कल ते इग्गालुरू हासुर मेन रोड अनेकल, बंगळुरू)

रात्री 8.00 वाजता
बंगळुरू विमानतळावर आगमन त्यानंतर मंगळुरू कडे प्रस्थान

सोमवार 08 मे 2023

सकाळी 9.00 वाजता
मंगळुरू येथून हेलिकॉप्टरने धर्मस्थळ येथे रवाना होणार

सकाळी 9.40 ते 10.40वाजता
श्री मंजुनाथ स्वामी मंदिराला भेट देऊन पूजा आणि दर्शन करणार तसेच धर्मस्थळ संस्थानचे धर्माधिकारी श्री वीरेंद्र हेगडे यांची भेट घेणार

दुपारी 11.00 वाजता
धर्मस्थळ येथून हेलिकॉप्टरने उडुपीकडे प्रस्थान

दुपारी 12 ते 12.30 वाजता
श्रीकृष्ण मंदिर उडुपी येथे पूजा आणि दर्शन घेणार

दुपारी 3.00 ते 4.00 वाजता
उडपी जिल्ह्यातील कापू विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी काढण्यात येणाऱ्या रोड शो मध्ये सहभागी होणार

दुपारी 4.00 ते 5.00 वाजता
उडपी विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी काढण्यात येणाऱ्या रोड शो मध्ये सहभागी होणार

संध्याकाळी 5.00 वाजता
प्रचार संपवून उडपीहुन हेलिकॉप्टरने मंगळुरूला परतणार

रात्री 9.00 वाजता
मंगळुरू विमानतळाकडे प्रस्थान करून मुंबईकडे रवाना होणार

रात्री 10 वाजता
मुंबईत आगमन आणि राखीव

Eknath shinde on 3 days karnataka election tour, to campaign for BJP with amit shah

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात