एकनाथ शिंदे : “तमाम शिवसैनिकांना साद”, हेच विधानसभेतल्या भाषणाचे “बिटवीन द लाईन्स”!!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सरकार वरील विश्वास दर्शक ठराव मंजूर करून घेतल्यानंतर विधानसभेत जे प्रदीर्घ भाषण केले त्यातले सार एका वाक्यात सांगायचे झाले तर राज्यभरातल्या सर्व शिवसैनिकांना त्यांनी आपले साद घातली, असेच सांगावे लागेल. Eknath shinde lured shivsainiks in his speech in maharashtra legislative assembly

आपला वाद आपले भांडण शिवसेनेशी आणि शिवसैनिकांशी नाही. त्याचबरोबर आधीच्या ठाकरे – पवार सत्ताकाळात शिवसैनिकांच्या नशिबी तडीपाऱ्या आणि वाँटेड या खेरीज दुसरे काही आले नाही. तळागाळातल्या शिवसैनिकांना सत्तेची मदत मिळाली नाही. त्यांच्यापर्यंत सत्तेचे लाभ पोहोचलेच नाहीत, हे त्यांनी वारंवार सांगितले.

शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या 40 आमदारांची प्रमुख तक्रार निधी वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अर्थमंत्री अजित पवार अन्याय करतात ही होती. त्याचा तपशीलवार उल्लेख मुख्यमंत्र्यांनी भाषणात केला नाही. पण त्याचा ओझरता उल्लेख करायला देखील ते विसरले नाहीत.

200 आमदारांचे टार्गेट

अजितदादा पवार, जयंत पाटील यांच्याशी असलेल्या वैयक्तिक माहितीचा त्यांनी जरूर उल्लेख केला पण राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी जर विधानसभा निवडणुकीत 100 आमदार निवडून आणायचे टार्गेट ठेवणार असेल तर सध्याची शिवसेना-भाजप युती म्हणजे शिंदे फडणवीस यांचे सरकार महाराष्ट्राच्या विधानसभेत 200 आमदार निवडून आणेल, असा इशारा देखील द्यायला एकनाथ शिंदे विसरले नाहीत.

– शिवसैनिकांना संदेश

एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची शैली जरी हलकीफुलकी आणि सर्व सदस्यांचे समाधान करण्याचे करण्याचा प्रयत्न करणारी असली तरी त्यापलिकडे महाराष्ट्रभरातल्या सर्वसामान्य शिवसैनिकांना एक संदेश यातून त्यांना द्यायचा होता तो त्यांनी दिला आहे. इथून पुढच्या काळात सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात जाऊन कामाला लागतील त्यांचे भांडण शिवसैनिकांची नाही भास्कर जाधव यांनी भीती व्यक्त केल्याप्रमाणे शिवसैनिक आपापसात रक्तपात करणार नाहीत, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.

एक प्रकारे शिवसेनेत बंड केल्यापासून ते सरकार स्थापनेपर्यंत ज्या पद्धतीने सर्व आमदार एकजुटीने वागले आणि राहिले. त्याचेच प्रतिबिंब आपापल्या मतदारसंघांमध्ये काम करताना राहील याची चुणूक एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिली आहे.

– न्यायालयातला आणि रस्त्यावरचा संघर्ष

शिवसेनेबरोबरचा संघर्ष न्यायालयात सुरूच राहील तो न्यायालयीन पातळीवर लढवून प्रत्यक्ष आपल्या मतदारसंघांमध्ये हे आमदार अधिक जोमाने काम करतील हेच त्यांनी दाखवून दिले. शिंदे यांच्या भाषणात भविष्यातल्या संघर्षाची बीजे नेमकी काय आहेत याची ओळख तर होतीच पण संघर्षावर मात कशी करायची याचे सूत्र देखील त्यांनी आवर्जून अधोरेखित केलेले दिसले. शिवसैनिकांचा जोश आणि त्याचबरोबर भाजपकडून त्यांना मिळणारा साधन संपत्तीचा ओघ यातून ही लढाई यशस्वी करण्याचा निर्धार त्यांच्या भाषणातून दिसून आला.

Eknath shinde lured shivsainiks in his speech in maharashtra legislative assembly

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात