Eknath shinde : लोकसभेसाठी सिनेमा पाठोपाठ एकनाथ शिंदेंचे विधानसभेसाठी नाटकाद्वारे ब्रॅण्डिंग!!

Eknath shinde

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Eknath shinde  लोकसभेत चाललेल्या खोट्या नॅरेटिव्ह तोडण्यासाठी भाजपने महाराष्ट्रात संघटनात्मक काम वाढवण्याचा प्रयत्न चालवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गुलाबी जॅकेट घालून स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्रँडिंग करत आहेत, तर त्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑन स्क्रीन आणि रंगभूमीवर जाऊन ब्रँडिंग च्या मागे लागले आहेत. Eknath shinde for vidhansabha branding

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये शिवसेना पक्षात मोठी बंडखोरी केली. पक्षातील ४० आमदारांना बरोबर घेत त्यांनी वेगळी चूल मांडली. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आणि पाठोपाठ निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देखील दिली. तसेच या पक्षाने भाजपाबरोबर युती करत राज्यात सत्तास्थापन केली. तेव्हापासून एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील हा सत्तासंघर्ष लवकरच व्यावसायिक रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. एकनाथ शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीवर आधारित नवं कोरं एकपात्री नाटक आता रंगभूमीवर अवतरणार आहे. अभिनेता संग्राम समेळ या नाटकात मुख्य भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं जात आहे. Eknath shinde

एकनाथ शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीवर आधारीत नवं नाटक रंगमंचावर येऊ पाहतंय. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीवर आधारीत ‘धर्मवीर’ व ‘धर्मवीर २’ असे दोन चित्रपट तयार झाले आहेत. यापैकी पहिला चित्रपट प्रदर्शित झाला असून दुसरा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. पाठोपाठ कर्मवीर नावाचं पुस्तक देखील प्रकाशित झालं आहे. आता शिंदेंच्या राजकीय जीवनावर आधारित नाटक रंगमंचावर येत आहे. या एकपात्री नाटकाद्वारे शिंदेंचा राजकीय प्रवास उलगडला जाणार आहे.


Mallikarjun Kharge : राहुल गांधी हेट स्पीचप्रकरणी खरगेंचे पीएम मोदींना पत्र; नेत्यांवर नियंत्रण ठेवण्याचे केले आवाहन


काय आहे नाटकाचं नाव?

या नाटकाद्वारे कोणत्या राजकीय घडामोडी पाहायला मिळणार? पडद्यामागच्या कोणत्या घटना उलगडल्या जाणार? शिंदेंच्या बंडाबाबत या नाटकात काय पाहायला मिळणार? हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ‘मला काही सांगायचंय – एकनाथ संभाजी शिंदे’ असं या नाटकाचं नाव असून हे एकपात्री नाटक आहे. प्राध्यापक, डॉ. प्रदीप ढवळ यांनी हे नाटक लिहिलं आहे. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ व अभिनेता संग्राम समेळ हे या नाटकाचं सादरीकरण करणार आहेत. प्रेरणा कला संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे. हे नाटक सध्या सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आलं आहे. सेन्सॉरच्या मान्यतेनंतर हे नाटक रंगभूमीवर अवतरेल.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. आता महराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीवर नाटक येतंय. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाटकात काय पाहायला मिळेल, याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे.

Eknath shinde for vidhansabha branding

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात