विशोष प्रतिनिधी
हिंगोली : Eknath Shinde काही लोक कार्यकर्त्यांना कस्पटा सारखे वागवितात, घरगडी समजतात त्यांना जनतेने जागा दाखवून दिली, मातांसाठी आता किती लाचारी पत्करणार, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ता. ४ हिंगोली येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.Eknath Shinde
हिंगोली येथे शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिंदे म्हणाले की, आमदार बांगर यांनी यापूर्वी काही जणांना कावड यात्रेसाठी बोलावले होते. मात्र ते कावड यात्रेसाठी आले नाहीत. मात्र ज्यांनाच कावडीत बसायचे होते ते कावड यात्रेला कसे येणार, ते दुसरीकडे थंड हवेच्या ठिकाणी फिरतात अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नांव न घेता केली. कावड यात्रेतील हिंदुत्वाचा जागर पाहायला मोठे मन लागते असे त्यांनी सांगितले.Eknath Shinde
राज्यातील काही जण कार्यकर्त्यांना घरगडी म्हणून वागवितात, मात्र आम्ही स्वतःलाच कार्यकर्ता समजून काम करत असून सर्व सामान्यांच्या सोबत राहून विकास कामे करणार आहे. सर्वसामान्य माणूसच आमचा केंद्रबिंदू असून त्यांच्यासाठीच जगायचे अन विकास करायचा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यात आमची दुसरी इनिंग सुरू असून राज्याला पुढे नेण्याचे काम करायचे आहे. आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलो नसलो तरी जनतेला सर्व समान्यांना सोन्याचे दिवस आणण्याचे प्रयत्न करणार असून हाच आमचा अजेंडा आहे. आमचा जाहीरनामा म्हणजे चुनावी जुमला असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र लाडकी बहीण योजना बंद होणारच नाही, शिवाय जाहीरनाम्यातील सर्व योजना टप्प्याटप्याने पूर्ण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
काँग्रेसच्या काळात झालेल्या बाँम्बस्फोटाच्या वेळी काँग्रेसची मंडळी दहशतवादाला धर्म नसतो असे सांगत होते, मात्र मालेगाव स्फोटाला भगवा दहशतवाद म्हटले. मतांसाठी व्होट बँक वाचविण्यासाठी किती लाचारी करणार असा सवाल त्यांनी केला. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले तरी सैन्याच्या कामगिरीवर शंका घेणारे हे कुठले देशभक्त आहेत. व्होट बँकेचे राजकारण करतांना भगवा दहशतवाद म्हणणाऱ्या हिंदू द्वेषींना जनता त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही असा दावा त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App