विशेष प्रतिनिधी
मुंबई : Shinde Shiv Sena आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय गणित जुळवत मोठा डाव खेळला आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेमध्ये युती होणार असून, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढण्याची तयारी दोन्ही पक्षांनी सुरू केली आहे.Shinde Shiv Sena
या युतीची अधिकृत घोषणा बुधवारी (17 जुलै) दुपारी 1 वाजता मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर दोघेही उपस्थित राहून युतीचे औपचारिक रूपाने जाहीर करतील, अशी माहिती मिळत आहे. महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मराठी आणि दलित मतांच्या एकत्रीकरणासाठी रिपब्लिकन सेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे.Shinde Shiv Sena
शिंदेंचा मतांच्या समीकरणावर भर
राज्यात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शिवसेना शिंदे गटाने आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नागपूरसारख्या महत्त्वाच्या महानगरांमध्ये मराठी आणि दलित मतांची संख्या निर्णायक आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारगटांना सोबत घेण्यासाठी शिंदे गटाने ही युती साधल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेचा दलित समाजात विशिष्ट प्रभाव असून, त्यांचा पाठिंबा मिळाल्यास शिंदे गटाला निवडणुकीत निश्चितच फायदा होऊ शकतो. दुसरीकडे, आंबेडकरांनाही शिवसेनेच्या यंत्रणेचा आणि सत्ताधारी महायुतीच्या पाठबळाचा फायदा होण्याची शक्यता आहे.
महायुतीचा विस्तार
दरम्यान, शिंदे गट आणि रिपब्लिकन सेनेच्या युतीमुळे सत्ताधारी महायुतीचा सामाजिक आधार अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यातील महायुतीच्या पटलावर आता दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणारा एक घटक अधिक जोडला जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुती एक संघटित, व्यापक आघाडी म्हणून समोर येईल, असे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App