Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे यांना आनंदराज आंबेडकरांची साथ; पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा

Shinde Shiv Sena

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Shinde Shiv Sena आनंदराज आंबेडकर यांचा रिपब्लिकन सेना पक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्ष यांच्या युतीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून या युतीची चर्चा होती. आज एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत आपल्या युतीची अधिकृत घोषणा केली. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा हा प्रयत्न असल्याचे या वेळी या दोन्ही नेत्यांनी सांगितले.Shinde Shiv Sena

लोकांच्या भल्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचा दावा एकनाथ शिंदे Shinde Shiv Sena  यांनी केला आहे. आमच्यात एकमेकांबद्दल विश्वास असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. या महाराष्ट्रातील दोन सेना आहेत. शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही रस्त्यावर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सेना असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. यातील एक सेना बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी असून दुसरी सेना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळेच आमच्यात एकदम चांगले जमेल, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी युतीची घोषणा केली आहे.Shinde Shiv Sena



DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन

या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशा शब्दात आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख केला. सर्वसामान्य माणसासोबत असलेली नाळ तुटू देता कामा नये, याचे पथ्य पाळण्याचे काम आजपर्यंत आम्ही केले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आनंदराज आंबेडकर हे देखील बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचे वारस आहेत. बाबासाहेबांच्या घटनेमुळेच आज सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदावर पोहोचू शकला आहे. एकनाथ शिंदे देखील त्यांच्या संविधानामुळेच मुख्यमंत्री होऊ शकला असल्याचे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना टोला

बाळासाहेब ठाकरे नेहमी आपल्या कार्यकर्त्याला सवंगडी समजा, असे सांगत होते. मात्र, काही लोक कार्यकर्त्याला घरगडी समजायला लागले होते, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या वतीने करण्यात येणाऱ्या आरोपांना देखील त्यांनी प्रत्युत्तार दिले. प्रत्येक आरोपाला मी उत्तर देत बसत नाही. मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो. माझा मुलगा ऑर्थो सर्जन आहे. मी डॉक्टर नसलो तरी छोटे-मोठे ऑपरेशन करत असल्याचे ते म्हणाले. मी परत त्या इतिहासात जाऊ इच्छित नाही. आपल्याला भविष्याकडे जायचे असल्याचे, त्यांनी म्हटले आहे. सध्या मोठ्या ऑपरेशनची गरज नाही. काही गोळ्या-औषधी देऊनही काम होत असल्याचेही ते म्हणाले.

बाबासाहेबांचे संविधान आणि शिवाजी महाराजांचा आदर्श

बाबासाहेबांचे संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श हे सर्व डोळ्यासमोर ठेवूनच आपण काम करत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आपले संविधान जगात सर्वोत्तम राहिले पाहिजे, असा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आहे. आनंदराज आंबेडकर हे देखील सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे सूत्र आनंदराज आंबेडकर यांनी पाळले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना संधी मिळाली पाहिजे, या भूमिकेतून ते काम करत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. कार्यकर्त्यांच्या मागे नेत्यांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या पासूनच शिवशक्ती-भीमशक्ती युती – आनंदराज आंबेडकर

बाबासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पासूनच शिवशक्ती-भीमशक्ती युती सुरू झाली होती. तीच ही युती असल्याचे रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. एकनाथ शिंदे यांचा मी कार्यकर्ता म्हणून उल्लेख करत असतो. कारण मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत देखील ते मुख्यमंत्री म्हणून वागले नाही तर कार्यकर्ता म्हणून त्यांनी कायम सामन्य माणसाच्या सुखदुःखाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला. असे म्हणत आनंदराज आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक त्यांनी केले आहे.

Shinde Shiv Sena, Anandraj Ambedkar’s Republican Sena Ally

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात