विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षांतच चढाओढ दिसून आली. प्रचारसभांमध्ये एकमेकांवर कुरघोड्या आणि टीकाटिप्पणी करण्याची स्पर्धा सुरू असताना मतदारांना प्रलोभने देणारी महायुतीतील बड्या नेत्यांच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, जयकुमार गोरे, भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यासह एकूण २० जणांच्या भाषणांची निवडणूक आयोगाकडून तपासणी होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने जिल्हाधिका-यांकडून अहवाल मागवला आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करणारी वक्तव्य महायुतीतील बड्या नेत्यांना भोवण्याची शक्यता आहे.Eknath Shinde
दहा दिवसाच्या प्रचारात महायुतीतील प्रमुख नेत्यांनी राज्यभरात सभा घेतल्या. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ अशा बड्या नेत्यांनी सभांचा सपाटाच लावला होता. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत आपल्या पक्षाच्या अधिकाधिक जागा निवडून याव्यात यासाठी महायुतीतील प्रमुख नेत्यांसह मंत्र्यांनी ही सभेच्या माध्यमातून आपल्या पक्षाला मतदान करा, अशी साद घातलीEknath Shinde
मटण खा कोणचेही, मात्र बटण दाबा कमळाचे
प्रचारसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहे तर अजित पवार यांनी अर्थ खात्याच्या कारभार त्यांच्याकडे असल्याने निधीला कात्री लावण्याचे वक्तव्य केले होते, तर चित्रा वाघ यांनी ‘मटण खा कोणचेही, बटण दाबा कमळाचे’ असे वक्तव्य केले, तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘मतदानाच्या आदल्या दिवशी घराबाहेर थांबा, लक्ष्मीदर्शन होईल’ असे वक्तव्य केले होते. प्रचारकाळात तब्बल २० नेत्यांनी अशा प्रकारची मतदारांना प्रलोभणे देणारी वक्तव्ये केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App