राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडलंय असं मला वाटतंय. त्यांनी बोलत राहावं. माझा त्यांच्यावर रोष नाही, असा पलटवार माजी मंत्री गिरीष महाजन यांनी केला आहे.Eknath Khadse’s mental balance has deteriorated, Girish Mahajan alleges
विशेष प्रतिनिधी
जळगाव : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडलंय असं मला वाटतंय. त्यांनी बोलत राहावं. माझा त्यांच्यावर रोष नाही, असा पलटवार माजी मंत्री गिरीष महाजन यांनी केला आहे.
एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये एकनाथ खडसे गिरीश महाजनांविषयी आक्षेपार्ह उल्लेख करत असल्याचं ऐकू येत आहे. यावरून महाजन म्हणाले, त्यांनी अतिशय अश्लील भाषेत प्रतिक्रिया दिली आहे.
पण त्यात खडसे साहेबांचा दोष नाहीये. मी त्यासाठी एकनाथ खडसेंना दोष देणार नाही. कारण वाढतं वय, इतके आजार आणि त्यात जो माणूस मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करत होता, त्याला आज आमदारकीही मिळत नाहीये.
त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं झालंय असं मला वाटतंय. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल कोणताही रोष नाही. त्यांनी बोलत राहावं. लोकांना कोण काय आहे हे सगळं माहिती आहे. पण खूप वेगळ्या मनस्थितीत ते सध्या आहेत.
राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्यांना आमदारकी मिळालेली नाही. लोकांनी त्यांच्या मुलीला मतदारसंघात नाकारलेलं आहे. त्यामुळे अशी अवस्था कुणाचीही होईल. त्या अवस्थेत ते बोलत आहेत.
सध्या व्हायरल होत असलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये एका मुलाचा एका व्यक्तीशी संवाद असून ही व्यक्ती म्हणजे एकनाथ खडसे असल्याचे बोलले जात आहे. या मुलाने ऑडिओ क्लिपमध्ये गावात पाणी नसून
आमदार गिरीश महाजन माझा फोन उचलत नाहीत, अशी तक्रार केली. त्यावर खडसेंनी बरोबर आहे, तो फक्त मुलींचेच फोन उचलतो, असं विधान केलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more