प्रतिनिधी
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ एअर अॅम्ब्युलन्सची सोय करून दिली आहे. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सूत्रे हलवली आहेत. Eknath Khadse suffered a heart attack
एकनाथ खडसे यांना उपचारासाठी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आणले आहे. दुपारच्या सुमारास खडसे यांना छातीत दुखत होते. त्यानंतर तात्काळ त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याचे समजते.
मुख्यमंत्री शिंदे यांना साताऱ्यामध्ये याची माहिती कळल्यानंतर त्यांनी खडसे यांना उपचारासाठी मुंबईत आणण्याची तयारी सुरू केली. त्यांच्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची सोय करण्यात आली. दुपारच्या सुमारास एकनाथ खडसे यांना छातीमध्ये दुखू लागले होते. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले पण सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App