वृत्तसंस्था
मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती मिळावी अशा आशयाची ईडीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ईडीची स्थगितीची याचिका विशेष सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे संजय राऊत यांची लवकरच सुटका होणार आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने राऊतांना 31 जुलैला अटक केली होती. ED’s plea dismissed by sessions court; ED in High Court sanjay raut
संजय राऊत यांच्या जामीनाला ईडीने विरोध दर्शवत त्याला स्थगिती देण्यात यावी अशी एक याचिका दाखल केली होती. त्यानंतर दुपारी 3 वाजता यावर सुनावणी करत विशेष सत्र न्यायालयाने ही स्थगिती द्यायला नकार दिला आणि संजय राऊतांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला.
ईडी मुंबई उच्च न्यायालयात जाणार
दोन लाखांच्या कॅश बाॅंडवर संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची सुटका करण्यात आली आहे. संजय राऊत हे मागच्या 100 दिवसांपासून तुरुंगात आहेत. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. राऊतांच्या जामीन अर्जावर आता ईडी मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या कामकाजाची वेळ साडे चार वाजेपर्यंत आहे. पण ईडीची ही याचिका तातडीने उच्च न्यायालयात घेतली जाणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App