प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या घरी आज सकाळी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने छापे घातल्याची बातमी आहे. सुमारे दोन तास छाप्याची कारवाई करत नबाब मलिक यांना ताब्यात घेतले असून सध्या मुंबईच्या कार्यालयात त्यांची चौकशी सुरू आहे.ED raids on Nawab Malik’s house; Money laundering case related to David started
दाऊद इब्राहिम त्याची बहीण हसीना पारकर यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांची चौकशी सुरू असल्याचे समजते. दाउदचा भाऊ इक्बाल कासकरला नुकतेच ईडीने ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली होती. त्या चौकशीतून काही राजकीय व्यक्तींची नावे पुढे आली आहेत. त्यानंतर नवाब मलिक यांच्या घरी छापे घालून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
दुसर्या बातमीनुसार नवाब मलिक हे स्वतःहून ईडीच्या कार्यालयात हजर झाले असून त्यांची चौकशी सुरू आहे. नवाब मलिक यांनी मुंबईमध्ये दाऊद इब्राहिम संबंधित असणाऱ्या मोहम्मद सलीम या व्यक्तीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या प्रकरणाचा या चौकशीशी संबंध असल्याचीही चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App