प्रतिनिधी
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. नवाब मालिक यांना कोर्टाने कोठडीत बेड आणि खुर्ची वापरण्याची परवानगी दिली असली तरी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने छापेमारीचा पुढचा अंक सुरू केला आहे. ED Raids Nawab Malik: ED raids near Goa compound in Kurla; Increase in the difficulty of Nawab Malik !!
ईडीचे अधिकारी सकाळी गोवावाला कंपाउंड शेजारी पोहोचले. तेथे त्यांनी एका जेष्ठ व्यक्ती कडून काही कागदपत्रे घेतली आहेत. सध्या त्या परिसरात ईडीचे अधिकारी छापे घालताना दिसत आहेत. ही कारवाई दिवसभर सुरू राहण्याचे संकेत मिळत आहेत. गोवावाला कंपाउंड मधली जमीन सुमारे 3 एकर आहे आणि तिची किंमत 300 कोटी रुपये आहे, असे ईडीच्या वकिलांनी कोर्टात सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर आजची छापेमारी महत्त्वाची आहे.
गोवावाला कंपाऊंड जवळच्या 300 कोटींच्या भूखंडाप्रकरणीच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मलिक प्रकरणाशी संबंधित माहिती मिळवण्यासाठीच ईडीने ही छापेमारी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ईडीच्या हाती काय माहिती लागते याकडे लक्ष लागले आहे.
आज सकाळीच ईडीच्या 8 ते 9 अधिकाऱ्यांच्या पथकाने कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड जवळ जाऊन छापेमारी सुरू केली. या टीममध्ये एक महिला अधिकारीही आहे. तेथे सीआरपीएफ जवानांचा मोठा फौजफाटाही तैनात केला आहे. गोवावाला कंपाऊंड जवळ एका ज्येष्ठ व्यक्तीजवळच्या काही कागदपत्रांची छाननी ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली. तसेच या व्यक्तीकडून अधिकाऱ्यांनी बरीच माहिती घेतली. ईडीचे अधिकारी या व्यक्तीला भेटायला आले यावरून या व्यक्तिनेच अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावल्याचे दिसून येत होते.
दाऊद गँगशी संबंधित व्यक्तीकडून नवाब मलिक यांनी भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे. या गोवावाला कंपाऊंडच्या बाजूलाच हा भूखंड आहे. त्यामुळे अधिकारी या ठिकाणी पोहोचल्याने मलिकांशी संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मलिक यांच्या अडचणीत अधिक वाढ होऊ शकते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App