वेश्यांचे पैसेही खाता, हे सरकार आहे की सर्कस, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल


वेश्यांचे पैसेही तुम्ही खात असाल तर हे सरकार आहे की सर्कस आहे? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.Eat the money of prostitutes too, this is the question of the government or the circus, Devendra Fadnavis


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर– वेश्यांचे पैसेही तुम्ही खात असाल तर हे सरकार आहे की सर्कस आहे? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.उत्तर कोल्हापुर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या समर्थनात प्रचारसभा झाली. या सभेसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले , भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते.

महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करताना फडणवीस म्हणाले, यापूर्वी आधी कोल्हापुरात यायचो तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा भगवे वस्त्र धारण केलेले फोटो दिसायचा. आता त्यांच्या फोटोसोबत सोनिया गांधींचा फोटोचे बॅनर दिसतात. हे उत्तर कोल्हापूर भगव्याचं आहे, ते भाजपाकडे आले पाहिजे. आता चुकलो तर पुन्हा भगव्याचे दर्शन होणार नाही.



महाविकास आघाडी सरकारच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्याबद्दल ते म्हणाले की, आमची लढाई माऊलींशी नाही तर तिच्या मागे असणाऱ्या पालकमंत्र्याशी आहे. 2024 साली हाच पालकमंत्री उत्तरेतून काँग्रेसची उमेदवारी घेऊन निवडणूक लढवणार आहे. राज्यात सध्या दहशतीचे वातावरण आहे, ते जनता रस्त्यावर उतरल्यावर चालू देणार नाही.

वेश्यांना मदत करतो असे राज्य सरकारने केंद्राला सांगितले आणि ते पैसे नांदेडच्या एका संस्थेला दिले. ते पैसे वेश्यांना नाही तर दुसऱ्यांनाच गेले असा आरोप फडणवीस यांनी केला. वेश्यांचे पैसेही तुम्ही खात असाल तर हे सरकार आहे की सर्कस आहे? असा सवाल त्यांनी केला.

Eat the money of prostitutes too, this is the question of the government or the circus, Devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात