वृत्तसंस्था
मुंबई : मुख्यमंत्री अधिवेशनाला स्वतः उपस्थित राहतील असे वाटले होते. पण ते आले नाहीत. अमेरिकेत विदाऊट ड्रायव्हरच्या गाडीचा शोध लागला, पण लोकशाही विदाऊट मुख्यमंत्री असा प्रकार आज पाहिला असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. Driver without car in America, Democracy without CM in the state; Sudhir Mungantiwar
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, हे अधिवेशन मराठवाडा आणि विदर्भावर अन्याय करणारे आहे. मुख्यमंत्र्यांचा फोटो पालिकेच्या जाहिरातीवर छापला होता, पण तिथे महापौर यांचा फोटो हवा होता. आता मला वाटतं शरद पवार यांचा फोटो राज्य सरकारच्या जाहीरातीवर वापरावा.
मुख्यमंत्र्यांनी चहापानावर आमच्यासारखा बहिष्कार टाकला. हे पहिले अधिवेशन आहे ज्यांनी चहापानाचे आमंत्रण दिले तेच गैरहजर राहिले आहे. मुख्यमंत्र्यांचा त्यांच्या सहकाऱ्यांवर विश्वास नाही. मुख्यमंत्र्यांनी आता अजित पवार किंवा आदित्य ठाकरे यांच्याकडे चार्ज द्यायला हवा. शक्ती विधेयक जर फुलफ्रुफ असेल तर त्याला आमचा पाठिंबा आहे.
सुधीर मुनगंटीवार विधानसभा निवडणुकीबाबत म्हणाले की, मी यावर आता विधानसभेत बोलणार आहे. काय कारण आहे निवडणुकीची नियमावली बदलण्याची. दुसऱ्या राज्यात पद्धत आहे म्हणून आपल्याकडे ती पद्धत आणणे योग्य नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App