पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे (सीओईपी) प्राध्यापक डॉ. दिलीप मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी तर नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. उज्वला शिरीष चक्रदेव यांची श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Dr. Ujwala Chakradev appointed as the Vice Chancellor of SNDT Women’s University, Dr. Dilip Malkhede as Vice Chancellor of Amravati University,
विशेष प्रतिनिधी
मुंबईः पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे (सीओईपी) प्राध्यापक डॉ. दिलीप मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी तर नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. उज्वला शिरीष चक्रदेव यांची श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ. उज्वला चक्रदेव यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली. डॉ. उज्वला चक्रदेव यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्हीआरसीई येथून वास्तुविद्याशास्त्र ही पदवी प्राप्त केली व त्यानंतर शहर नियोजन या विषयात एम. टेक. तसेच वास्तुविद्याशास्त्र शिक्षण या विषयात पीएच.डी. प्राप्त केली.
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांचा कार्यकाळ २ जुलै रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचेकडे त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. दिलीप मालखेडे:
पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक डॉ. दिलीप नामदेवराव मालखेडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ. मालखेडे यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केली.
डॉ. मालखेडे सध्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद येथे सल्लागार या पदावर प्रतिनियुक्तीवर आहेत. माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ १ जून २०२१ रोजी संपल्यामुळे हे कुलगुरूपद रिक्त होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचेकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App