विशेष प्रतिनिधी
पुणे : Dr Gauri Palve-Garje गौरी ही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. ती पेशाने डॉक्टर होती. इतरांचे प्राण वाचवणारी होती. स्वतःचं आयुष्य संपवेल असं कधी वाटलं नव्हतं. तिने आत्महत्या केली नाही तर ही तिची हत्याच आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला.Dr Gauri Palve-Garje
गौरी यांचे वडील अशोक पालवे आणि आई अलकनंदा तसेच गौरीचे मामा पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आम्ही तिचे लग्न अनंत गर्जे या तरुणाशी लावून दिले. लग्नानंतर अनंतने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. नंतर ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. धमक्या दिल्या. म्हणाला, असे केलेस तर मारेन, हे करेन, ते करेन. गौरीने फारसे कुणाला सांगितले नाही. ती मनाने खंबीर होती. आत्महत्या करेल असे कधी वाटलं नव्हतं. कुटुंबीयांनी मागणी केली की, या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी. आमच्यावर कुणी दबाव टाकू नये. मंत्री पंकजाताईंनीही आम्हाला तसेच या लेकीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही गौरीच्या कुटुंबीयांसह नातेवाइकांकडून केली जात आहे.Dr Gauri Palve-Garje
…तर अनंतच्या कानाखाली मारली असती-पंकजा मुंडे
पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर या गावात जाऊन पालवे कुटुंबाची भेट घेतली. या वेळी पालवे कुटुंबीयांनी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केली. वडील अशोक पालवे यांनी टाहो फोडला. त्यानंतर मुंडेदेखील भावुक झाल्या होत्या. अनंत गर्जे याने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा होणारच. मला कल्पना असती तर मी अनंतच्या दोन कानाखाली लगावल्या असत्या, असेही पंकजा म्हणाल्या.
रूपाली चाकणकर, नीलम गोऱ्हे आक्रमक
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गौरीच्या कुटुंबाची भेट घेत सखोल चौकशी करून कठोर शिक्षेचा विश्वास दिला. तर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वतंत्र, निष्पक्ष चौकशीची मागणी केली असून लवकरच कुटुंबीयांना भेटणार असल्याचे संागितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App